आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Biz Idea: शिमलाच्या ओपन जेलचे कैदी चालवतात कॅफे; वर्षाची कमाई 3.5 कोटी रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला - हिमाचल प्रदेशच्या ओपन जेलमध्ये दोन वर्षांपूर्वी कैद्यांनी एका कॅफेची सुरुवात केली होती. त्याच कॅफेने 2017-18 वित्तीय वर्षात 3.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा कॅफे ओपन जेलचे 135 कैदीच चालवतात. या कॅफेतून केवळ स्थानिकांना नव्हे, तर धरमशाला, शिमला आणि नाहन येथे फूड व्हॅन सेवा सुद्धा दिली. पर्यटकांसह स्थानिक लोक सुद्धा या कॅफेला पसंती देत आहेत. कॅफेची सेवा आणि फूड क्वालिटी दर्जेदार असल्याने येथे दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत आहे. सोबतच, ज्यावेळी लोकांना या कॅफेच्या संचालकांबद्दल कळते तेव्हा ते आवर्जून येथे भेट द्यायला येतात. 


शिमल्यातील टाका बेंचमध्ये हे बुक कॅफे आहे. येथे ग्राहकांना चहा, कॉफी आणि फूड आयटमसोबतच पुस्तके सुद्धा वाचायला मिळतात. हत्येचा आरोपी जयचंद गेल्या 8 वर्षांपासून या ओपन जेलमध्ये आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे, कॅफेमध्ये येणाऱ्या विद्यार्थी आणि पर्यटकांशी संवाद साधून माझ्या आयुष्यात खूप बदल झाला आहे. आता मी आपल्या चांगल्या भविष्याचा विचार करत आहे. याच संकल्पनेवर हिमाचल प्रदेशचे तुरुंग महासंचालक सोमेश गोयल यांनी कॅफेची स्थापना केली होती. या कॅफेशी कैद्यांना जोडून त्यांच्या वर्तनात अमुलाग्र बदल घडून आला आहे. हॉटेल आणि फूड व्हॅन हे दोन्ही काम कैदीच करतात.


कारा बाजार नावाने बनवले Website
सोमेश गोयल यांनी सांगितले, की कैदी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजजवळ फूड व्हॅन लावतात. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि फूडला पुणे, बंगळुरू अशा शहरांतून मागणी आहे. यासाठी 'कारा बाजार' नावाची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात दोन जिल्हा कारागृह, दोन मध्यवर्ती कारागृहांसह 14 तुरुंग आहेत. यात 2000 कैदी आहेत. जेल प्रशासन हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे एक फॅक्ट्री बनवण्याच्या तयारीत आहे. यात कैद्यांना हॅन्डीक्राफ्ट वस्तू, बेकरी आणि खुर्च्यांसह इतर फर्निचर बनवण्याची संधी दिली जाईल. त्यांना राजधानीसह दुसऱ्या शहरांमध्ये पाठवण्याची देखील तयारी आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...