आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा असाही कहर, शेकोटीजवळ आला पोपट; मग कॅमेऱ्यात कैद झाला असा नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व लोक शेकोटी पेटवून बसले होते. तेवढ्यात थंडीने कुडकुडत असलेला पोपटही शेक घ्यायला आला. - Divya Marathi
सर्व लोक शेकोटी पेटवून बसले होते. तेवढ्यात थंडीने कुडकुडत असलेला पोपटही शेक घ्यायला आला.

बाराबंकी (यूपी) - उत्तर भारतात वाढलेल्या थंडीमुळे माणसांसोबतच पशु-पक्षीही त्रस्त झाले आहेत. असेच काहीसे दृश्य येथे पाहायला मिळाले, जेव्हा एक पोपट थंडीने थरथर कापणारा पोपट एका धगधगणाऱ्या आगीजवळ जाऊन शेक घेऊ लागला. हे दृश्य पाहून उपस्थित लोकांचे मन हेलावले. तेवढ्यात एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.  

 

थंडीने थरथरणारा पोपट शेकण्यासाठी उतरला झाडाखाली...
- स्थानिक रहिवासी प्रखर शुक्ल म्हणाले की, ''सकाळच्या कडाक्याच्या थंडीत आम्ही येथे अंत्यसंस्कारासाठी आलो होतो.''
- ''तेवढ्यात जवळच्याच एका झाडावर बसलेला पोपट खाली उतरला. थंडीने थरथरणारा पोपट हळूहळू धगधगणाऱ्या आगीजवळ येऊन बसला.'' 
- ''यादरम्यान मी मोबाइलमधून आगीने शेकत असलेल्या पोपटाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. थंडीमुळे त्रस्त असलेल्या पोपटाला आगीची ऊब भेटल्याने बरे वाटत होते. तो जराही भ्यायला नाही किंवा उडूनही गेला नाही.''


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ व फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...