आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमांडो सुरक्षा कवच काढल्यानंतर राबडी देवींचा नितीश सरकरावर आरोप- आमच्या कुटुंबाला मारण्याचे षडयंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राबडी देवींची सुरक्षा काढून घेतल्यावरुन राजकारण तापले आहे. - Divya Marathi
राबडी देवींची सुरक्षा काढून घेतल्यावरुन राजकारण तापले आहे.

पाटणा - बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचा मुद्दा तापताना दिसत आहे. त्यांच्या सुरक्षेतील बीएमपी कमांडो हटवण्यात आले आहे. यावरुन राबडी देवी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि सुशील मोदी हे आमच्या परिवाराला मारण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, सरकारची इच्छा असेल तर आम्ही शासकीय निवासस्थानही सोडण्यास तयार आहोत. 

 

आमचे काही बरे-वाईट झाले तर बिहार सरकार जबाबदार 
- राबडी देवी म्हणाल्या, 'नितीशकुमार, सुशील मोदी आणि त्यांचे सरकार आमच्या कुटुंबाला मारण्याचे षडयंत्र रचत आहे. मात्र आम्ही त्याला घाबरत नाही. जर आमच्या कुटुंबाचे काही बरे-वाईट झाले तर त्यासाठी बिहार सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल. सरकारने जर  घर सोडण्यास सांगितले तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत. आमचे संरक्षण जनता करेल. 

'लालूजींना मारण्याचे तर षडयंत्र नाही' 
- राबडी देवी म्हणाल्या, लालू यादव तुरुंगात आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. ते आजारी आहेत की औषधी देऊन त्यांना मारण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्यांची शुगर लेव्हल वाढत चालली आहे. सरकारवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा सवाल राबडी देवींनी उपस्थित केला. 


राबडी देवी, तेजस्वी आणि तेज प्रताप यांनी परत केली सुरक्षा 
- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी बीएमपी कमांडो सुरक्षा परत केली आहे. ते म्हणाले, 'मंगळवारी सीबीआय चौकशीनंतर सायंकाळी शासकीय निवासस्थानी तैनात बीएमपीचे 32 कमांडो काढण्यात आले आहे.' तेजस्वी यांनी सरकारवर सुरक्षा कपातीचा आरोप केला आहे. 
- तेजस्वी यादव म्हणाले, 'राज्य सरकारने मी राहात असलेला 5, देशरत्न मार्ग येथील बंगला रिकामा करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे राबडी देवी यांनी माजी मुख्यमंत्री, तेजस्वींनी माजी उपमुख्यमंत्री आणि तेजप्रताप यादव यांनी आमदार म्हणून मिळालेली सुरक्षा परत केली आहे.'
- लालू यादव आणि राबडी देवी यांना माजी मुख्यमंत्री या नात्याने बिहार पोलिसचे एसएसजीची विशेष सुरक्षा मिळत होती. 

बातम्या आणखी आहेत...