आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिराच्या बाजूनेच लागेल निकाल, आता आंदोलनाची गरज नाही : कोकजे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अयोध्या -अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्यासाठी आंदोलनाची गरज नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मंदिराच्या बाजूनेच लागणार आहे, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.  


कोकजे यांनी शरयू नदीच्या किनाऱ्यावर स्नान केले आणि नंतर रामललाचे तसेच प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर श्रीरामजन्मभूमी न्यास कार्यशाळेत पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की, विहिंपचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्यासह अनेक साधू-संतांनी श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे स्वप्न पाहिले होते. तेथेच मंदिर व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. मंदिर आंदोलनामुळेच सध्या परिसरात रामललाची मूर्ती विराजमान आहे. मंदिर बांधकामासाठी आता आंदोलनाची गरज नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मंदिराच्या बाजूने लवकरच लागेल, असे दिसत आहे. माझ्या अनुभवानुसार सहा महिन्यांत न्यायालयाचा निकाल मंदिराच्या बाजूने लागेल. आमची बाजू न्यायाची आहे.

 

त्यामुळे निर्विवादपणे राम जन्मभूमीवरच भव्य मंदिर तयार होईल. सर्वोच्च न्यायालयाला कलम १४२ नुसार सर्व निकाल बदलण्याचा आणि कुठलाही निकाल देण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. राम जन्मभूमी हा श्रद्धेचा विषय आहे. संत-धर्माचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार मंदिराशी संबंधित सर्व कामे होतील, असेही कोकजे यांनी स्पष्ट केले.  

 

पुढील स्लाईडवर वाचा काय म्हणाले कोकजे बद्दल इक्बाल....   

बातम्या आणखी आहेत...