आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क - mbwhatsapp.blogspot नावाच्या ब्लॉगवर कित्येक काँटॅक्ट नंबर आहेत. या ब्लॉगने या नंबर्सच्या दोन कॅटेगरी बनवल्या आहेत, ज्या इंडियन गर्ल्स आणि पाकिस्तानी गर्ल्स या नावाने आहेत. दोन्ही कॅटेगरीँमध्ये 300 हून जास्त नंबर्स देण्यात आले आहेत. इंडियन कॅटेगरीत एकूण 149 काँटॅक्ट नंबर आहेत. दुसरीकडे, काही तरुणींचे फोटोही यावर देण्यात आले आहेत. यामुळे कदाचित तुमचाही नंबर सार्वजनिक झालेला असू शकतो. ब्लॉगरचे म्हणणे आहे की, हे सर्व व्हॉटसअॅप नंबर आहेत.
# Truecaller वर आला हा रिझल्ट
या ब्लॉगवर दिलेले नंबर खरे आहेत वा खोटे याची माहिती घेण्यासाठी आम्ही truecaller वर ते सर्च केले. त्यामध्ये तीच नावे आली जी या वेबसाइटवर लिहिलेली आहे. तथापि, काही रिझल्ट वेगळेही आले. अशा वेळी जर ही नावे आणि नंबर्स खरे असतील या तरुणींची खासगी माहिती लीक होऊ शकते.
# नंबर्सचा होऊ शकतो मिसयूज
कोणत्याही फोन नंबरवरून आधारकार्ड, बंक, जीमेल यासोबतच इतर अनेक डिटेल्स जोडलेल्या असतात. अशा वेळी या नंबर्सचा मिसयूजही केला जाऊ शकतो. यामुळेच तुमचा किंवा परिचिताचा यात नंबर नाही ना, याची खातरजमा करणे गरजेचे ठरते. यामुळे तुमच्या प्रायव्हसीलाही धोका उद्भवू शकतो.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, Truecaller सर्चच्या रिझल्टचा स्क्रीनशॉट...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.