आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाळावर टिळा लावण्याचे आहेत अनेक फायदे, असे आहे वैज्ञानिक कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून कपाळावर टिळा लावण्याची परंपरा चालत आलेली आहे. साधारणपणे चंदन, कुंकू, माती, हळद, भस्म याचा टिळा लावण्याची पद्धत आहे. टिळा लावण्यामागे अध्यात्मिक परंपरेबरोबरच वैज्ञानिक कारणही आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे कारण.. 


1. मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केल्यास कपाळावर टिळा लावणे फायद्याचे समजले जाते. कपाळ चेहऱ्याच्या मध्यभागी असते. त्यामुळे मध्यभागीच टिळा लावला जातो. त्यामुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासात वाढ होते. 

2. कपाळाच्या मध्यभागी टिळा लावल्याने शांती आणि समाधानाचा अनुभव मिळतो. टिळा लावल्याने मानसिक उत्साहावरही बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येते. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरीयल तत्व असतात. ते रोगांपासून मुक्ती मिळवून देण्यात मदत करतात. 

3. तुम्ही जर रोज कपाळावर चंदनाचा टिळा लावला तर मेंदूमध्ये सेराटोनिन आणि बीटा अँडोर्फिनचा स्त्राव योग्य प्रमाणआत होतो. त्यामुळे उत्साह वाढतो. हा उत्साह व्यक्तीला चांगल्या कामात उपयोगी ठरतो. तणाव आणि डोकेदुखीही बऱ्याच अंशी कमी होते. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या टिळ्याचे विविध प्रकार.. 

 

बातम्या आणखी आहेत...