आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोफिया हयातची पतीविरोधात पोलिस तक्रार, गळा दाबून मारण्याचा केला प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - बिग बॉसची माजी स्पर्धक असलेली मॉडेल सोफिया हयातने पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सोफियाचा पती व्लाद सँटेस्क्यू याने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याचे सोफियाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत सोफियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पती व्लाद सँटेस्क्यूबरोबर तिचे लग्न जवळपास मोडले आहे. काही दिवसांपासून त्यांच्यात विविध वाद झाल्याचे समोर येत आहे. व्लाद सध्या लंडनमध्ये आहे की, रोमानियात याबाबत माहिती नसल्याचे सोफिया म्हणाली. 


बोल्डनेसमुळे अनेकदा वादात अडकलेल्या सोफियाने अचानक धार्मिक मार्गाचा अवलंब करत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर अचानक तिने लग्नाची घोषणा केली. लग्नानंतर हनिमूनचे फोटो, व्हिडिओ शेअर करत तिने परत सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आता आणखी एक नवा वाद तिच्या आयुष्याबरोबर जोडला गेला आहे. 


गर्भपाताचा केला सामना 
सोफियाने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नंसीबाबत माहिती दिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांतच गर्भपात झाल्याने तिला मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागले आहे. व्लादबरोबरचे तिचे नातेही संपुष्यात आल्यासारखे आहे. व्लाद मानसिक रुग्ण असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याचेही सोफिया म्हणाली आहे. 

 

पतीने फसवले.. 
पती व्लादने तिला फसवले असल्याचे सोफियाने सांगितले. व्लादने सोफियाला तो यशस्वी आर्किटेक्चर डिझायनर असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात तसे नाही. ज्यावेळी सोफियाने दिलेली 10 लाखांची वेडिंग रिंग व्लाडने अवघ्या दीड लाखांसाठी विकली त्यानंतर तिला त्याच्याबाबत सत्य समजले. 

बातम्या आणखी आहेत...