आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Credit Card प्रथमच वापरताय! मग या 5 बाबी कायम लक्षात असू द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - सध्या लोक मोठ्या प्रमाणावर क्रेडीट कार्डचा वापर करत आहेत. पण क्रेडीट कार्ड वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे ठरते. विशेषतः तुम्ही प्रथमच क्रेडीट कार्ड वापरत असाल तर. कोणतेही काम पहिल्यांदाच करताना आपण उत्साहात किंवा संकोचापोटी काही गोष्टींकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे भविष्यात नुकसान होऊ शकते. क्रेडिट कार्डबाबतही असे होते. त्यामुळे प्रथम क्रेडीट कार्डचा वापर करताना. काय काळजी घ्यावी हे सांगत आहेत, क्रेडिट इन्फॉरमेशन कंपनी सिबिल (CIBIL) च्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हर्षला चंडोरकर. त्यांनी पाच मुद्द्यांतून ही माहिती दिली आहे. 

 
1. सर्व माहिती घ्या.. 
क्रेडिट कार्ड घेताना व्याज दर, क्रेडिट भरण्याचा कालावधी, फीस याची पूर्ण माहिती घ्या. काही छुपे नियम आहेत का पाहून घ्या. क्रेडिट कार्ड घेताना व्याजदरासाठी निगोशिएशन होते. पण अनेकांना ते माहितीच नसते. त्यामुळे अप्लाय करताना संपूर्ण माहिती घ्या. 

 
2. पूर्ण लिमिटपर्यंत खर्च करणे टाळा 
क्रेडिट कार्डचे पूर्ण लिमिट वापरण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यास क्रेडिट फेडण्याचा बोझा वाढतो. तसेच जास्त खर्चाची सवयही लागते. त्याचा क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो. 

 

3. बिल वेळेवर भरा 

दर महिन्याला क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा. त्यामुळे तुम्हाला टेन्शनही राहणार नाही, आणि तुमचा क्रेडिट स्कोरही चांगला राहील.  

 
4. सिबिल स्‍कोर आणि रिपोर्ट अॅक्सेस करा 
तुमचा क्रेडिट रिपोर्ट काय आहे. त्यात काय आहे याची माहिती असल्यास तुम्हाल नियोजन करण्यात मदत होईल. त्याशिवाय रिपोर्टमध्ये चुकीची माहिती असल्यास ते तुम्हाला माहिती असेल. 

 
5. खूप क्रेडिट कार्ड घेणे टाळा 

खूप क्रेडिट कार्ड घेणे टाळा. जास्त कार्डसाठी अप्लाय केले तर ते तुमच्या रिपोर्टसाठी नकारात्मक ठरू शकते. त्याशिवाय खूप कार्ड सांभाळणे आणि नियोजन करणेही कठीण असते. एखाद्याचे बिल भरायला तुम्ही विसरू शकता. 

बातम्या आणखी आहेत...