आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - शहरातील रहिवासी लेफ्टिनंट हरिसिंग बिष्ट दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. परंतु, धारातीर्थी पडण्याआधी त्यांनी असे काम केले ज्यामुळे अवघा देश त्यांची कायम आठवण काढत राहील. गोळ्यांनी शरीराची अक्षरश: चाळणी झालेली असतानाही त्यांनी एका दहशतवादी संघटनेच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांच्या कुटुंबाला नुकतेच पॉवर विंग नावाच्या संस्थेने सन्मानित केले आहे.
अशी आहे या शहिदाची विजयगाथा...
- 21 जुलै 2000 रोजी लेफ्टिनंट हरीसिंह बिष्ट यांना माहिती मिळाली होती की, जम्मू कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मानधार सेक्टरच्या मंझियारी गावात दहशतवाद्यांची एक टोळी लपून बसलेली आहे.
दहशतवाद्यांच्या गोळीबारात झाले जबर जखमी
- हरिसिंह यांनी आपल्या टीमसोबत सर्च ऑपरेशन सुरू केले. तेवढ्यात दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या गोळीबारामुळे हरिसिंह जबर जखमी झाले.
असे केला दोन दहशतवादी कमांडरचा खात्मा
- यानंतर हरिसिंह जमिनीवर रांगत-रांगत दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचले आणि मग एका पायावर उभे राहून अर्धा तास देशाच्या शत्रूंवर गोळ्यांची बरसात केली. हरिसिंह यांच्या या गोळीबारामुळे हिजबुल मुजाहिद्दीनचा पीर पंजाल इलाख्याचा डिव्हिजनल कमांडर आबू अहमद तुर्की आणि एरिया कमांडर अबू हमजा यांचा खात्मा झाला. आणि शत्रूला यमसदनी पाठवूनच हा बहादूर जवान शहीद झाला.
शहिदाच्या लहान बहिणीने सांगितल्या आठवणी...
शहीद लेफ्टिनंट हरिसिंह बिष्ट यांची लहान बहीण मोनिका बिष्ट यांनी DivyaMarathi.Com शी बातचीत केली आणि आपले मोठे भाऊ लेफ्टिनंट हरिसिंह बिष्ट यांच्या आयुष्याशी निगडित अनेक इंटरेस्टिंग किस्से शेअर केले.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, हरि सिंह यांचे आईवडील त्यांना डॉक्टर बनवू इच्छित होते, पण त्यांनी जॉइन केली आर्मी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.