आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकबरानंतर सर्वाधिक काळ भारतावर राज्य, तरीही समाधी मातीची; औरंगजेबाचे Unknown Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगजेबची 3 मार्च रोजी 311वी पुण्यतिथी आहे. दुसऱ्या फोटोत खुलताबाद येथील समाधीसमोर तुळस. (फाइल) - Divya Marathi
औरंगजेबची 3 मार्च रोजी 311वी पुण्यतिथी आहे. दुसऱ्या फोटोत खुलताबाद येथील समाधीसमोर तुळस. (फाइल)

औरंगाबाद- मुघल बादशाह आलमगीर औरंगजेब. भारतीय उपमहाद्वीपांवर 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राज्‍य करणारा शहनशाह. औरंगजेबची आज (3 मार्च) 311वी पुण्यतिथी आहे.  भारतच नव्‍हे तर संपूर्ण आशिया खंडात एकाही राजाला त्‍याच्‍या पूर्वी आणि नंतर एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर असे दीर्घकाळ राज्‍य करता आले नाही. औरंगजेबने जवळपास पन्‍नास वर्षांहून अधिक वर्ष शासन केले. ‘मुघल-ए-आझम’ अकबर नंतर त्‍यानेच भारतावर अधिक काळ राज्‍य केले. दक्षिण भारतावर साम्राज्‍य स्‍थापीत करण्‍यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. औरंगजेबाच्‍या कार्यकाळात मुघल शासन मोठ्या प्रमाणावर विस्‍तारले होते. तत्‍कालीन काळात सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत शक्‍तीशाली शासक म्‍हणून त्‍याची ओळख निर्माण झाली होती. त्‍याने जगाच्‍या एक चतुर्थांश लोकांवर राज्‍य केले. त्‍याच्‍या प्रजेची संख्‍या सुमारे 15 कोटी होती. भारत, पाकिस्‍तान, बांगलादेश, अफगाणिस्तान हे आज वेगवेगळे झालेले असले तरी अशा प्रदेशावर एकहाती दीर्घकाळ सत्‍ता गाजवणाऱ्या एवढ्या मोठ्या राजाची समाधी मातीची आहे. त्‍यावर साधे छतही नाही तसे का? व्‍यक्‍तिगत जीवनात तो कसा होता? याची माहिती खास DivyaMarathi.Com च्‍या वाचकांसाठी...

 

पुढील स्‍लाइडवर वाचा औरंगजेबाची समाधी मातीचीच का ?

बातम्या आणखी आहेत...