आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयासमोरच विद्यार्थ्यांचा गँगवॉर, डोक्यावर रॉड मारून विद्यार्थ्याची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झज्जर- झज्जर पॉलिटेक्निक बाहेर सोमवारी 10-12 तरूणांनांच्या एका गटाने एका विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. झज्जर पॉलीटेक्निक संस्थेतून दिड वर्षांपूर्वी डिप्लोमा केलेल्या तरूणाची ओळख पटली असून तो बहादूरगड येथील मांडौठी गावातील 24 वर्षीय तरूण अशी झाली आहे. पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये झालेल्या वादाचा बदला घेण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात बेरी येथील गंगाटान येथील एक तरूण अमित देखील जखमी झाला आहे. पोलिस त्याची विचारपूस करत आहेत.

 

- झज्जर-बहादुरगड मार्गावरील नेहरू कॉलेजसमोर कँटीनच्या बाहेर नवीन बसलेला होता. तेवढ्यात 10 ते 12 तरूण बाइकवरून आले आणि त्यांनी नवीनवर हल्ला केला.
- काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी नवीनचा हल्लेखोर तरूणांसोबत वाद झाला होता. नवीन पॉलिटेक्नीकच्या दिशने पळाला.
- जखमी अमितने सांगितले की, त्याने रक्तभंबाळ झालेल्या नवीनला बाइकवर बसवले आणि बाइक पळवण्याचा प्रयत्न केला.
- ते पॉलीटेक्निकच्या गेटवर पोहोचले, तेवढ्यात बुलेटवरून  हल्लेखोर तरूणांनी पुढून येऊन गाडी अडवली. हल्लेखोर तरूणांच्या ग्रुपमधील एकाने नवीनच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला.
- अमितला देखील लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. रॉडचा हल्ला होताच नवीनने जागीच दम तोडला. यानंतर हल्लेखोर तरूण तेथून पळून गेले. अमित जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.
- पोलिस अधिकारी सोमवीर यांनी सांगितले की, हत्याचे कारण आद्याप कळू शकलेले नाही. प्राथमिक तपासात बदला घेण्याचा उद्देशाने हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
- पोलिसांनी या प्रकरणी 12 लोकांच्या विरोधात केस दाखल केली आहे. नवीनचा जिव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमितचा देखील यात समावेश आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...