आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Swift ची नवी एडिशन झाली लाँच, ड्युएल कलरसोबत असतील हे हायटेक फीचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - जपानी कंपनी सुजुकीने आपली लेटेस्ट कार स्विफ्ट (Swift) चे Sport BeeRacing लिमिटेड एडिशन लाँच केले आहे. या एडिशनमध्ये नवनव्या कलर्ससोबतच काही कॉस्मेटिक चेंजेस केलेले आहेत. कार सध्या इटलीमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. याची किंमत 18,000 यूरो (तब्बल 14.40 लाख रुपये) असेल. दुसरीकडे, या कारची बुकिंग 18 एप्रिलपासून सुरू होऊ शकते. 

 

# ड्युएल-टोन कलर मिळतील
स्विफ्टच्या या नव्या एडिशनमध्ये यलो आणि दुबई ब्लॅक मेटॅलिकवाले ड्युएल-टोन कलर मिळतील. सोबतच रेसिंग स्ट्रिप्सही देण्यात आले आहेत. कारचे इतर फीचर्स Swiftच्या Sport व्हेरिएंटसारखे राहतील. म्हणजेच याच्या फ्रंट एंडमध्ये लार्ज हनीकॉम्ब ग्रिल आणि नव्या डिझाइनचा बंपर मिळेल.

 

# 8.1 सेकंदांत 100kmची स्पीड
या कारमध्ये 1.4 लीटरचे बूस्टरजेट ट्रर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजन देण्यात आले आहे, जे 138bhp आणि 230Nmचे टॉर्क जनरेट करण्याची क्षमता ठेवते. यासोबतच यात 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. कारची टॉप स्पीड 210kmph आहे. दुसरीकडे, ही 0-100kmph ची स्पीड फकत 8.1 सेकंदांत घेते.

 

# असे आहेत इतर फीचर्स
स्विफ्टच्या Sport BeeRacing लिमिटेड एडिशनच्या इंटीरियरमध्ये बकेट स्टाइल सीट्स, स्पोर्टी पेडल्स मिळतील. यात 7-इंची थिन स्पोक अलॉय व्हील्स आहेत, जे डुअल टोन कलरमध्ये दिले गेले आहेत. याच्या रिअरमध्ये रूफ माउंटेड स्पॉयलर, ब्लॅक प्लास्टिक क्लॅडिंग आणि रेसिंग स्ट्रिप्स देण्यात आल्या आहेत. कारचे वजन 975 किलोग्राम आहे. ही कार भारता केव्हा लाँच केली जाणार आहे, याची डिटेल कंपनीने अद्याप दिलेली नाही.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, Swiftच्या एडिशनच्या इंटिरिअरचे काही फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...