आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात मंदीर बांधले, त्यात दीड महिना ठेवला मुलीचा मृतदेह; म्हणाले- ती देवी, जिवंत होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर (सवाईमाधोपूर)- सवाईमधापूर येथील गंगापूर शहरात अनेक दिवसांपासून घरात ठेवलेला एका तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहातून दुर्गंधी सुटल्यानंतर तिचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. तांत्रिक तिला जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते. तरूणीच्या बहिनीला तिच्या आई वडिलांनी घरात कैद करून ठेवले होते. मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर बहिनीने कशीतरी आपली सुटका करून घेतली आणि भावाकडे पोहचून घडलेल्या प्रकारविषयी माहिती दिली.  पोलिसांनी तरूणीच्या आई-वडिलांसह सहा लोकांना अटक केली आहे. 


असे आहे संपूर्ण प्रकरण....
- इंदिरा मार्केटमद्ये ताराचंद आणि त्याची पत्नी उर्मिला यांचे घर आहे. या घरात राहणारी एक तरूणी सोमवारी आपल्या भावाकडे पोहोचली. तिने सांगितले की, 14 जानेवारीपासून तिने आपली मोठी बहिन अनिता(35)ला पाहिले नाही. तिला घरात कैद करण्यात आले आहे आणि तिच्यासोबत काहीतरी चुकीचे झाले आहे. यानंतर भावाने मंगळवारी पोलिसात पोहोचून तक्रार केली. मंगळवारी रात्री उशीरा पोलिस त्यांच्या घरी गेले आणि समोरील नजारा पाहून पोलिसांना देखील धक्का बसला.
- तक्रार करण्यासाठी आलेल्या दोन्ही भाऊ-बहिनीची मोठी बहिन खोलीत मृतावस्थेत पडलेली होती. तिच्या मृतदेहातून दुर्गधी येत होती. पोलिसांनी मृतदेहाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या आई-वडिलांनी त्यांना अडवले आणि ती आद्याप जिवंत असल्याचा दावा करू लागले.
- यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

 

 घारतच बनवले होते तरूणीचे मंदीर...
ताराचंद यांचा मुलगा श्याम सिंह राजपूत याने या संबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्याने सांगितले की, त्याची मोठी बहिन अनितावर गेल्या 12 वर्षांपासून गजेंद्र, गोपाल सिंह, बंटी, मंजू आणि नीटू हे सर्व उपचार करत आहेत. तिच्यावर उपचार करणाऱ्यांनी सांगितले की, अनितावर भुत-प्रेताची सावली आहे. अनिता आता ठिक झाली असून तिच्या शरिरात आता देवीने प्रवेश केला आहे असा दावा तांत्रिकाने केला. उपाचार करणाऱ्या तांत्रिकांनी घारतच मंदिर बनवले होते. त्या मंदिरात एका गादीवर अनिताला बसवून तिच्यावर उपचार करण्यात येत होते.


मोहीनीला घरात कैद करून ठेवले....
- ताराचंद आणि त्याच्या पत्नीने छोटी मुलगी मोहीनीला घरात कैद करून ठेवले होते. ते तिला घरातून बाहेर जाऊ देत नव्हते.
- काही दिवसांपूर्वी खोलीतून असह्य वास येऊ लागल्यानंतर मोहीनीने कशीतरी आपली सुटका केली आणि भावाला जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

 

फोटो : मदनमोहन शर्मा

पुढील स्लाइडवर वाचा, दीड महिन्यांपर्यंत सुरू होते मृतदेहावर तंत्र-मंत्राचा उपचार....

बातम्या आणखी आहेत...