आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत ७ वेळा राज्यपाल राजवट, १९९० नंतर राज्यात अस्थिरता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसोबत पीएम नेहरू व इंदिरा गांधी. - Divya Marathi
काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसोबत पीएम नेहरू व इंदिरा गांधी.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे राज्यात पुन्हा अस्थिरता येत आहे. राज्यात गेल्या १२ वर्षांपासून आघाडीचा काळ सुरू आहे आणि कोणीही अद्याप कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. याआधी राज्याच्या राजकारणात नॅशनल कॉन्फरन्सचा दबदबा राहिलेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ११ निवडणुका झाल्या. राज्याने सात वेळा राज्यपाल राजवट अनुभवली.


१९५७-१९७७ : २ निवडणुकांत नॅशनल कॉन्फरन्स, तिसऱ्या, चाैथ्यामध्ये काँग्रेस जिंकली 
- पहिल्यांदा १९५७ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. नॅशनल कॉन्फरन्सने (नॅकॉ)  ७५ पैकी ६८ जागा जिंकल्या व बख्शी मोहंमद मुख्यमंत्री झाले. ६२ मध्ये नॅकॉ जिंकली.  
- १९६७-७२ मध्ये काँग्रेस जिंकली. १९७५ मध्ये इंदिरांचा नॅकॉच्या अब्दुल्लांशी करार झाला. कासीम यांनी अब्दुल्लांसाठी खुर्ची सोडली.


१९७७-१९८२ : काँग्रेसने अब्दुल्ला सरकार पाडले, प्रथम राज्यपाल राजवट
- २६ मार्च १९७७ ते ९ जुलै १९७७ पर्यंत राज्यपाल राजवट राहिली.  
- १९७७ मध्ये काँग्रेसने अब्दुल्ला सरकार पाडले. प्रथमच राज्यपाल राजवट.  १९७७ च्या निवडणुकांत ‘नॅकॉ’ जिंकली व शेख अब्दुल्ला दुसऱ्यांदा सीएम झाले.  १९८२ मध्ये शेख अब्दुल्लांच्या निधनानंतर मुलगा फारूक अब्दुल्ला सीएम झाले. - काँग्रेसच्या मदतीने अब्दुल्लांचे मेहुणे गुलाम शाह यांनी सरकार पाडले. शाह दोन वर्षे सीएम राहिले. ६ मार्च ते ७ नोव्हेंबर १९८६ पर्यंत राज्यपाल राजवट.

 

१९८६-२००२: राज्यात सन १९९० ते १९९६ पर्यंत दीर्घकाळ राज्यपाल राजवट
- १९८६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पुन्हा नॅकॉ जिंकली व फारुख सीएम झाले.
- १९९० मध्ये राज्यपाल जगमोहन यांच्याविरोधात राजीनामा. १९९६ पर्यंत राज्यपाल राजवट.
- १९९६ च्या निवडणुकीत पुन्हा नॅशनल काॅन्फरन्सला यश मिळाले. अब्दुल्ला तिसऱ्यांदा सीएम.

 

२००२- २०१८ : आघाडी सरकारांचा काळ सुरू, चार वेळा राज्यपाल राजवट लागू
- २००२-१८ दरम्यान चार वेळा राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली.
- २००२ च्या निवडणुकीत काँग्रेस-पीडीपी सरकार स्थापन. मुफ्ती मोहंमद सईद सीएम झाले. ३ वर्षांनंतर काँग्रेसचे गुलामनबी सीएम. पीडीपीने सरकार पाडले.  
- २००८ च्या निवडणुकीत कोणासही बहुमत मिळाले नाही. नॅकॉ- काँग्रेसचे सरकार स्थापन. उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले.  
- २०१४ मध्ये भाजप- पीडीपीमध्ये आघाडी. पीडीपीचे मोहंमद सईद पुन्हा सीएम झाले. त्यांच्या निधनानंतर मेहबूबा मुफ्ती राज्याच्या पहिल्या महिला सीएम झाल्या. 

बातम्या आणखी आहेत...