आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन खरेदी करताना ही कागदपत्रे पाहणे अत्यंत गरजेचे, जाणून घ्या का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - कोणतीही व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी करताना आपल्या मेहनतीची एक मोठी कमाई त्यात गुंतवत असते. त्यामुळे जी प्रॉपर्टी खरेदी केली जात आहे, तिची वैधता पूर्णपणे तपासणे अत्यंत गरजेचे होऊन जाते.

> म.प्र. हायकोर्टातील अॅडव्होकेट संजय मेहरा सांगतात की, जर तुम्ही एखाद्या टाउनशिपमध्ये प्रॉपर्टी खरेदी करत आहात आणि तेथे सर्व बँका लोन देण्यासाठी तयार आहेत तर तेथे मोठी रिस्क नाही असे समजायला हरकत नाही. कारण बँका कोणत्याही टाउनशिपमध्ये तेव्हाच लोन देतात जेव्हा तेथील टाइटल (स्वामित्व) आणि सर्च क्लिअर असते. याउपरही व्यक्तीने आपल्या पातळीवर काही बाबींची पडताळणी करायलाच पाहिजे. आज आम्ही सांगत आहोत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्ही कोणकोणत्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

 

लिंक डॉक्यूमेंट्स चेक करा
> तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर सर्वात आधी संबंधित कागदपत्रे तपासा. म्हणजे ती प्रॉपर्टी आतापर्यंत कितीवेळा खरेदी आणि विक्री झाली आहे ते पाहा.
> हे तुम्हाला जुन्या रजिस्ट्रींवरून लक्षात येईल. ज्या कुणाकडून प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्याच्याकडून जुन्या रजिस्ट्रीची कॉपी घ्या.
> मग हेही पाहा की सर्व रजिस्ट्रीमधील डिटेल एकमेकांशी जुळत आहेत अथवा नाही. जो तुम्हाला प्रॉपर्टी विकत आहे त्याचे आयडेंटिटी प्रूफ पाहा, ते कागदपत्रांसोबत मॅच करा. प्रॉपर्टी विकणाऱ्याकडून पॉवर ऑफ अॅटॉर्नीची कॉपी घ्या.

 

भूमी रेकॉर्डची माहिती तपासा, पाहा पुढच्या स्लाइडवर...

बातम्या आणखी आहेत...