आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

120 वर्षाचा पति आणि 122 वर्षाची आहे पत्नी, साजरा केला लग्नाचा 100वा वाढदिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बठिंडा- येथील हररंगपूरा येतील भगवान सिंह (वय 120 वर्ष) आणि त्यांची पत्नी धन कौर (वय 122 वर्ष) यांनी आपल्या लग्नाचा 100वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. भगवान सिंह यांचे वय सरकारी कागदपत्रांनुसार 118 वर्ष आहे.


आधार कार्डवर लिहिले आहे एवढे वय...
- आधार कार्डवर त्यांचे वय 1 जानेवारील 1900 आहे. परंतु, ते सांगतात की त्यांच्या जन्म 1898 मध्ये झाला आणि त्यांची पत्नी धन कौरचा जन्म 1896 मध्ये झाला.
- स्वातंत्र्यापूर्वी ग्रामिण भागात जन्मल्यामुळे त्यांच्या जन्माचा कुठलाही पूरावा नाही. परंतु, त्यांच्या मुलांचे वय पाहून आणि गवातील वृद्धांच्या बोलण्यातून त्यांनी केलेला दावा योग्य वाटतो.
- भगवान सिंह आणि धन कौर यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे. सर्वात मोठी मुलगी 90 वर्षाची आहे, तर सर्वात छोटा मुलगा 55 वर्षाचा आहे.
- जागृकता कमी असल्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल करू शकलेले नाही. त्यांच्या एवढ्या मोठ्या आयुष्याचे रहस्य नशेपासून दुर, साधे जेवण  आणि 100व्या वर्षी देखील मेहनतीचे काम हे आहे. 
- भगवान सिंह यांचा मुलगा नत्था सिंह यांचे सांगितले की, वडिलांचा जन्म 1898 मधील आहे. ते सुरूवातीपासूनच नशेपासून दूर आहे आणि साधे जेवण जेवत आहे.
- नत्थाने सांगितले की, जरी त्यांचे वडिल आता ठीक-ठाक बोलू शकत नसले, तरू त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत आईसोबत शेतात काम केले आहे.
- ते नेहमी 1947 च्या फाळणीच्या आठवणीने अस्वस्थ होतात.  त्यांनी नेहमी सकारात्मक विचार केला.


ही आहे चौथी पीढी....
- कुटुंबात सध्या 12 लोक आहेत. भगवान सिंह व धन कौर त्यांची चौथी पीढी पाहत आहेत.
- कुटुंबात मुलगा नत्था सिंह, त्याची पत्नी, दोन मुलं, दोन सुना आणि चार नातू आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...