आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिप्लब देब त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, जिष्णू देब बर्मन यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपल्ब देव आणि राम माधव. - Divya Marathi
बिपल्ब देव आणि राम माधव.

आगरतळा - भाजपचे प्रदेशाध्यक्ष बिप्लब कुमार देब हे त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असतील. तर आदिवासी समाजातील जिष्णू देब बर्मन उप-मुख्यमंत्री बनतील. आगरतळामध्ये भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी आमदारांच्या बैठकीत नव्या नेत्याची निवड केली. त्यात भाजपचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित होते. त्यांनीच मीडियाला ही माहिती दिली. सुत्रांच्या मते, 8 मार्च शपथविधी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहही उपस्थित असतील. 


कोण आहेत बिप्लब देब?
नाव : बिप्लब कुमार देब, भाजप प्रदेशाध्यक्ष 
वय : 48 वर्षे 
जन्म : उदयपूर, त्रिपुरा
मतदारसंघ : बनमालीपूर, पश्चिम त्रिपुरा


बिप्लबकडे जबाबदारी का?
- त्रिपुरा युनिव्हर्सिटीतून 1999 मध्ये पदवी मिळवली, तेव्हापासून समाजसेवेचे काम करतात. 
- स्वच्छ प्रतिमा आहे. एकही गुन्हेगारी प्रकरण नाही. 
- प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्ती 5.85 कोटी सांगितली. 


संघाशी नीकटचे नाते 
- संघाशी संलग्न राहिलेले आहेत. संघटनेत काम केले आहे. भाजपच्या थिंक टँकपैकी एक रहिलेल्या केएन गोविंदाचार्य यांच्याशी काम केले आहे. 


जनतेपर्यंत म्हणणे पोहोचवण्यात यशस्वी 
- बिप्लब यांनी त्रिपुरामध्ये अगदी तळागाळाच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी परीश्रम घेतले. निवडणुकीपूर्वी ते म्हणाले होते, राज्यात डाव्यांचे सरकार 25 वर्षांपासून जनतेला मूर्ख बनवत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही हे देशातील सर्वात गरीब राज्य आहे. 
- भाजप सत्तेत आले तर हे राज्य आदर्श राज्य बवनू असे आश्वासन त्यांनी दिले होते. जनतेपर्यंत आपला मुद्दा पोहोचवण्यात बिप्लब यांना यश आले. 
- त्यांच्या नेतृत्वात डाव्यांचे अनेक समर्थक भाजपमध्ये आले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 1600 पेक्षा अधिक लेफ्ट सपोर्टर्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...