आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात लेनिनचा आणखी एक पुतळा उद‌्ध्वस्त; तीन दिवसांत 770 हाणामाऱ्या, 1000 वर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरतळा- त्रिपुराच्या बेलोनियामध्ये सोमवारी रशियन क्रांतीचे नायक व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा पाडल्यानंतर हिंसाचार पेटला आहे. समर्थक व विरोधकांत तीन दिवसांत ७७० चकमकी झडल्या असून त्यात एक हजारपेक्षा जास्त जण जखमी झाले. मंगळवारीही सबरूम गावात लेनिनचा आणखी एक पुतळा पाडण्यात आला. यावरून भाजप अाणि माकपकडून आरोप- प्रत्याराेप हाेत आहेत.

 

- लेनिन अतिरेकी होता. भारतात त्याचा पुतळा कशाला? डाव्यांना इतकीच गरज असेल तर त्यांनी मुख्यालयात पुतळा बसवून त्याची पूजा करावी. 
- सुब्रमण्यम स्वामी, राज्यसभा खासदार, भाजप


माकपने व्यक्त केली नाराजी 
- साऊथ त्रिपुरा डिस्ट्रिक्टच्या बेलोनिया सबडिव्हीजनमध्ये लेनिनच्या पुतळ्यावर जेसीबी चालवत ही मूर्ती पाडण्यात आली. पाच वर्षांपूर्वी याठिकाणी ही मूर्ती लावण्यात आली होती. 
- पोलिसांच्या मते, जेसीबीच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे, तो मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेबाबत डाव्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


त्रिपुरात अनेक ठिकाणी तोडफोड 
- भाजपच्या विजयानंतर राज्यात माकपच्या कार्यालयांसह अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. 
- माकपने त्यासाठी भाजप आणि त्याच्या सहकारी आयपीएफटी कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. 
- माकप कार्यकर्त्यांच्या घरावरही हल्ले करण्यात आल्याचे पक्षातर्फे म्हटले गेले आहे. 
- भाजपचे म्हणणे आहे की, माकपच्या विरोधात लोकांचा राग बाहेर येत आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...