आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क - WhatsAppने भारतात आपली मोस्ट-अवेटेड सर्व्हिस डिजिटल पेमेंट्स (Digital Payments) ला लाइव्ह केले आहे. या सर्व्हिसचा फायदा घेण्यासाठी युजरला आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. तथापि, ही सर्व्हिस सध्या बीटा युजर्ससाठीच लाइव्ह करण्यात आली आहे. या फीचरच्या मदतीने युजर सहजगत्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने पेमेंट करू शकतील. व्हॉट्सअॅपने नुकतेच बीटा युजर्ससाठी 4 जणांमध्ये एकत्रितरीत्या व्हिडिओ कॉलिंग फीचरही लाँच केले आहे.
# 20 कोटी भारतीयांना मिळेल फायदा
व्हॉट्सअॅपच्या Payments फीचरचा फायदा 200 मिलियन युजर म्हणजेच तब्बल 20 कोटी लोकांना मिळेल. WhatsApp वर जगभरातून 1.5 बिलियन म्हणजेच तब्बल 150 कोटी युजर्स आहेत, यात 20 कोटी भारतीय आहेत. कंपनी लवकरच सर्व युजर्ससाठी हे लाइव्ह करेल. सध्या बीटा व्हर्जनवर हे सुरू झालेले आहे. हे iOS युजरला व्हर्जन 2.18.21 आणि अँड्रॉइडला व्हर्जन 2.18.41 वर मिळेल.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या फीचरला कसे वापरू शकाल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.