आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगालमध्ये लोकसभेच्या २२ जागा जिंकणार; अमित शहा यांना विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरूलिया- राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात सूड भावनेतून 'हिंसक कारवाई' करण्याची नीती राबवण्याचे काम मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजप लोकसभेच्या २२ जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


गुरुवारी आयोजित जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेस बांगलादेशातून स्थलांतरित होणाऱ्यांना रोखण्याची इच्छा असली तर राज्यातील ममता यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ते काम केलेले नाही. राज्यात हिंसाचार वाढला आहे. त्यास ममता बॅनर्जी यांचे सरकार जबाबदार आहे. राज्यातील लोक संगीत ऐकत होते. मात्र ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात जनतेला बाॅम्बचे आवाज ऐकण्याची वेळ आली आहे. हिंसाचार ही बंगालची संस्कृती कधीच नव्हती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटोपाध्याय इत्यादी अनेक महान व्यक्तींमुळे या भूमीची जगाला आेळख आहे. परंतु ममतांच्या कार्यकाळात भाजपचे किमान २० कार्यकर्ते मारले गेले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. राज्यात अनागोंदी आहे. हिंसाचार वाढल्याचे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...