आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोराला धडा शिकवण्यासाठी पर्समध्ये आणला चाकू, हात पकडताच घुसवला पोटात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपूरी (मध्य प्रदेश)- शहराच्या फिजिकल पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील मोहिनी सागर कॉलनीतील अंगणवाडी कर्मचारी महिलेने सोमवारू दुपारी एका टवाळखोराची चप्पलांनी धुलाई केली. पोलिसांनी सांगितले की, सदर तरूण गेल्या महिनाभरापासून महिलेला त्रास देत होता. सोमवारी देखील तरूणाने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेने भररस्त्यात त्याला चप्पलने माहरणान करत त्याची धुालाई केली. फिजिकल पोलिस ठाण्याचे प्रभारी विकासा यादव यांनी सांगितले की, महिलेने पर्समध्ये ठेवलेला भाजी कापण्याचा चाकू काढला आणि त्याच्या पोटात भोकसला. या घटनेत तरूणाला गंभीर जखम तर नाही झाली, परंतु, रस्त्यावर सुरू असलेली झटापट पाहून लोकांची मोठी गर्दी जमली होती. लोकांनी आरोपी तरूणाला पकडले आणि त्यानंतर महिलेने त्याची चप्पलाने मारत धुलाई केली.


मी अन्यायाचा बदला घेतला, इतर महिलांनी देखील विरोध करायला हवा...
शहरातील शांतिनगरमध्ये दुबे डॉक्टरच्या समोर दुपारी 12 वाजता मोहिना येथील अंगनवाडीमध्ये काम करणारी एका कर्मचारी महिलेने इरफान नावाच्या तरूणाची चप्पलाने धुलाई केली. तो तिला छेडत होता. महिलेने सांगितले की, त्याच्या दररोजच्या हरकतींमुळे मी तंग झाले होते. आज त्याला धडा शिकवायचाच हे मी आधीच ठरवले होते. त्यामुळेच घरातून निघतानाच पर्समध्ये चाकू घेऊन निघाले. जसा त्याने माझा हात पकडला, मी त्याच्या पोटात चाकू खुपला. त्याला मारण्याचा माझा काहीच उद्देस नव्हता. परंतु, त्याला भिती दाखवण्याचा विचार मी केला होता. मला समाधान आहे, की मी माझ्यासोबत होत असलेल्या अन्यायाचा बदला घेतला. माझ्या प्रमाणे इतर महिलांनी देखील विरोध करायला हवा.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...