आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात कमळ फुलवण्यासाठी भाजपने पाठवले योगींना, असा खेळला आदित्यनाथांनी डाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपुरामध्ये भाजपच्या यशात योगींचा वाटा मोठा आहे. - Divya Marathi
त्रिपुरामध्ये भाजपच्या यशात योगींचा वाटा मोठा आहे.

नवी दिल्ली/आगरतळा -  त्रिपुरा आणि नागालँडमध्ये कमळ उमललेल आहे. त्रिपुरामध्ये डाव्यांची सत्ता उलथवून लावण्यात भाजपला यश आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची रणनीती, जाहीरसभा यांचे जेवढे योगदान राहिले आहे तेवढेच योगदान योगी आदित्यनाथ यांचेही आहे. 

 

-25 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून लावणे भाजपसाठी सोपे नव्हते. कारण 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला येथे खातेही उघडता आले नव्हते. यामुळेच भाजपने येथे आपला खास डाव खेळला. राजकीय सूत्रांची माहिती आहे, की निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजपच्या लक्षात आले होते की येथे आपल्याला पाय ठेवण्यासही जागा मिळताना दिसत नाही. त्यानंतर भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर हलचाली सुरु झाल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्रिपुरा येथे पाठवण्याचा निर्णय झाला. 

 

पुढील स्लाइडमध्ये, योगींनी त्रिपुरात काय केले...

बातम्या आणखी आहेत...