आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाने आधी साईबाबांची मागितली माफी, मग केले असे काही; घटना CCTV मध्ये कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - येथे एका तरुणाने पैशांची चणचण भासत असल्याने एखाद्याकडून उधार घेण्याऐवजी किंवा एखाद्याची मदत घेण्याएवेजी थेट साईबाबांचे मंदिर गाठले. येथे आरोपीने साईबाबांची माफी मागितली आणि त्यांचा चांदीचा मुकुटच लंपास केला. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपीलाही अटक झाली आहे.
 
असे आहे प्रकरण...
- ही घटना टिकरापारामधील आहे. येथे राहणारा 23 वर्षीय शुभम पांडेय मुकुटनगरमध्ये एकटा राहतो आणि खासगी नोकरी करतो.
- त्याच्या आईवडिलांचे निधन झालेले आहे. त्याला अचानक पैशांची गरज पडल्याने त्याला नवी आयडिया सुचली. त्याने साईबाबांच्या मूर्तीचा मुकुट चोरण्याचा प्लॅन बनवला.
- रविवारी सकाळी सव्वा 6 वाजता संजयनगरातील शीतला माता मंदिरात आरोपी पोहोचला. त्या वेळी मंदिरात कोणीही नव्हते.
- आरोपीने तेथे पोहोचताच साईबाबांना नमन केले आणि मंदिराच्या दारावरील पडदा सरकवला.
- यानंतर तो साईबाबांच्या मूर्तीमागे गेला आणि हळूच तेथून मुकुट काढून शर्टात लपवून बाहेर गेला.
- पुजारी शैलेंद्र ठाकूर मंदिरात आले तेव्हा त्यांना काहीतरी झाल्याचे जाणवले. त्यांनी लक्षपूर्वक पाहिले असता साईबाबांच्या डोक्यावरील मुकुट गायब होता.
- त्यांनी पोलिसांत जाऊन मुकुट चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला शोधून काढले.
- पोलिसांनी सोमवारी त्याला कोर्टापुढे हजर केले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...