आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A.K.Algiri News In Marathi, DMK, M.Karunanidhi, Tamil Nadu, Divya Marathi

द्रमुकने केली ए.के अलगिरीची पक्षातून हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - सततच्या पक्षविरोधी कृतीमुळे द्रमुकचे प्रमुख एम. करूणानिधींनी आपला मुलगा ए.के. अलगिरीचे पक्षातून हकालपट्टी केली आहे.आपल्या धाकट्या बंधूला आणि लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्‍यात आलेल्या उमेदवारांना अलगिरी यांनी नेहमी लक्ष्‍य केल आहे.14 जानेवारी रोजी अलगिरी यांना आपल्या बेशस्त
वर्तनाबाबत कारणे दाखवा नोट‍िस बजावण्‍यात आली होती व त्यात स्पष्‍टीकरण मागवण्‍यात आले होते. त्यांनी ती दिली नसल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली आहे, असे करूणानिधी यांनी सांगितले. पक्ष सरचिटणीस आणि मी अलगिरीबाबत चर्चा करून निर्णय घेतला आहे, असे करूणानिधी यांनी वार्ताहरांना सांगितले.


एमडीएमके नेते वैको यांनी भाजपप्रणित एनडीएबरोबर आघाडी केली आहे. विरूध्‍दनगरच्या लोकसभा उमेदवारीसाठी वैको यांनी अलगिरी यांचा पाठिंबा मिळावा यासाठी भेट घेतली होती. या सर्व घडामोडींमुळे करूणानिधींनी अलगिरींची पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे. अ‍लगिरी यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचे संपर्क ठेवण्‍यात येऊ नये असे द्रमुकने मागील आठवड्यात आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना बजावले आहे.