आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा बाबा आधी होता हलवाई; भक्त महिलेलाच केले बेशुद्ध, विवस्त्र करून केले हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत अमरपुरी ऊर्फ बिल्लू बाबावर बलात्काराचा आरोप आहे. - Divya Marathi
संत अमरपुरी ऊर्फ बिल्लू बाबावर बलात्काराचा आरोप आहे.
टोहाना (फतेहाबाद) - हरियाणाच्या आणखी एका बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राजनगर रहिवासी एका महिलेने भाटियानगरमधील बाबा बालकनाथ मंदिराचा संत अमरपुरी ऊर्फ बिल्लू याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 
 
काय आहे बाबाची पूर्ण कहाणी...
- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भजे आणि जिलेबी बनवणारा हलवाई दुकान बंद करून तांत्रिक बनला. हळूहळू लोक त्याच्याकडे जादूटोणासाठी येऊ लागले. महिलेने सांगितले की, ती मागच्या 7-8 वर्षांपासून या मांत्रिक बाबाकडे इलाजासाठी येत होती. त्याच्याकडे दूरदूरहून लोक यायचे.
 
महिलेने केला हा आरोप
- 11 ऑक्टोबरच्या रात्री बाबाने महिलेच्या पतीला फोन करून तिला उपचारांसाठी बोलावले. पतीने पत्नीला भाटियानगरच्या मंदिरात सोडले व परत गेला. तिथे बाबाने प्रसाद म्हणून महिलेला अंमली पदार्थ खाऊ घातला यामुळे ती बेशुद्ध झाली.
- महिलेला एका तासाने शुद्ध आली तेव्हा तिने पाहिले तर तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. पूर्ण शरीर ठणकत होते. जेव्हा तिने बाबाला विचारले की, माझ्यासोबत हे काय केले? तेव्हा त्याने धमकी दिली की, ही गोष्ट कुणाला सांगू नकोस, जर तू कुणाला काही म्हणशील तर वाईट परिणाम होतील.
- यानंतर रात्रीच्या वेळी महिलेने घरात जाऊन तिच्या पतीला सर्व घटना सांगितली. पण बाबाने घरीही फोन करून तिला धमकावले. यामुळे भयभीत झालेल्या महिलेने पतीसह थेट पोलिस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दिली.
 
बलात्कारी बाबावर गुन्हा दाखल
- महिला पोलिस अधिकारी मंजू सिंह म्हणाल्या की, महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्या म्हणाल्या की, आरोपी बाबाला ताब्यात घेतले आहे. तसेच महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला फतेहाबाद रुग्णालयात नेण्यात आले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित प्रकरणाचे आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...