आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्यापेक्षाही खराब होते येथील पाणी, एका साधूने स्वच्छ केली 160 किमीची नदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब)- स्वच्छ भारत अभियानातंर्गत पंजाबमधील पर्यावरण कार्यकर्ते संत बलबिरसिंग सिचेवाल यांचा अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांना यावेळी सफाईगिरी अवॉर्ड देण्यात आला. यासाठी देशभरातून 14 लोकांची निवड करण्यात आली होती. पंजाबमधून केवळ सिचेवाल यांचे नाव समोर आले होते. 160 किलोमीटर अगदी नाल्यात रुपांतरीत झालेली नदी सिचेवाल यांनी स्वच्छ करुन दाखवली. सरकारने या प्रकल्पाचे कौतुक केले असून गंगा सफाईसाठी हे मॉडेल राबविले जाईल असे सांगितले आहे.
अशी स्वच्छ केली 160 किलोमीटर नदी
- या नदीच 40 गावांमधील सांडपाणी सोडले जात होते. त्यामुळे नदी म्हणजे सांड पाण्याचा एक मोठा प्रवाहच झाली होती. त्याने जवळपासच्या शेतांनाही पाणी मिळत नव्हते.
- 2000 मध्ये सिचेवाल यांनी या नदीची स्थिती बदलण्याचा प्रण केला आणि कामाला सुरवात केली.
- त्यांनी सहकारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीने नदीचे तट बांधले. शेजारी रस्ता तयार केला.
- जनजागृती अभियान राबवून लोकांना कचरा नदीत न फेकण्याचे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
- नदीत सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यात आले. त्यासाठी गावांमध्ये मोठमोठी गटारे बांधण्यात आली.
- नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
- या नदीशेजारुन जाताना आधी नाकावर रुमाल ठेवावा लागायचा. पण आता या नदीच्या किनारी लोक पिकनिकसाठी येतात.
ही आहेत वैशिष्ट्ये
- कपूरथला जिल्ह्यातील सुल्तानपूर परिसरात तब्बल 160 किलोमीटर परिसरातही नदी वाहते.
- 500 वर्षांपूर्वी या नदीच्या किनारी गुरु नानक देव यांना अंतर्ज्ञान प्राप्त झाले होते. त्यानंतर त्यांची ओळख नानक पासून गुरु नानक अशी झाली होती.
कोण आहेत सिचेवाल
- बाबा बलबिरसिंग सिचेवाल पंजाबमधील धर्मगुरु आहेत. त्यांचे जगभरात फॉलोअर्स आहेत.
- पर्यावरणाबाबत सिचेवाल कायम जनजागृती करतात.
- टाईम मॅगझिनने त्यांचा समावेश जगातील 50 पर्यावरण हिरोंमध्ये केला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सिचेवाल यांनी या नदीचा कसा केला कायापालट... असाच प्रयोग गंगा नदीवर राबवला जाणार आहे...
बातम्या आणखी आहेत...