आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडगाव मर्डर: मुलाचा गळा कापण्यापूर्वी लैंगिक अत्याचार? आरडाओरड करताच केली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरे बाबू को वापस ला दो... ही आर्त हाक आहे त्या मुलाच्या आईची ज्याची शुक्रवारी शाळेच्या टॉयलेटमध्ये डेडबॉडी सापडली. - Divya Marathi
मेरे बाबू को वापस ला दो... ही आर्त हाक आहे त्या मुलाच्या आईची ज्याची शुक्रवारी शाळेच्या टॉयलेटमध्ये डेडबॉडी सापडली.
गुडगाव-  येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत असणाऱ्या मुलाच्या हत्येच्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. गुडगावचे डीसीपी यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की, स्कुल बसच्या कंडक्टरने हत्येपुर्वी मुलासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने आरडाओरड करण्यास सुरूवात केल्यानंतर घाबरलेल्या कंडक्टरने त्याची हत्या केली. अशोक कुमार असे या कंडक्टरचे नाव आहे. शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या मुलाचे वय 8 वर्षे होते. मृत मुलाचे नाव प्रद्युम्न असून तो गुडगावमधील शामकुंज येथे राहात होता. त्याचे वय वय 8 वर्षे होते.
 
कंडक्टरच्या खिशात सापडला चाकू...
डीसीपींनी सांगिलत्या नुसार, कंडक्टरने आपल्या खिशात चाकू ठेवला होता. तो शाळेचे टॉयलेट यूज करण्यासाठी गेला, तिथे त्याने मुलाला पाहिले आणि त्यानंतर त्याने हे कृत्य केले. कंडक्टर मागिल 6-8 महिन्यांपासून शाळेत काम करत होता.
 
घरातून व्यवस्थित गेला होता मुलगा 
मुलाचे वडील वरुण यांनी सांगितले, की शुक्रवारी सकाळी मुलगा व्यवस्थित शाळेत गेला होता. काही वेळातच शाळेतून शिक्षकांचा फोन आला. त्यांनी सांगितले, मुलाची तब्ब्यत बिघडली आहे. शाळा प्रशासनानेच त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. 
- पालक हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचे कळाले आणि त्यांना धक्का बसला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 
 
मुलाने टॉयलेटमधून बाहेर येण्याच केला प्रयत्न...
- पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाजवळून एक चाकू जप्त केला. मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निशान होते.
- पोलिसांनी चौकशीदरम्यान शाळेतील 30 सीसीटीव्ही फुटेज तपासले.
- पोलिसांच्या मते, हल्यानंतर मुलाने टॉयलेटमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शाळेतील इतर मुलांनी त्याला पाहिले. मुलांनी ही घटना शाळेच्या माळीला सांगितली. त्यानंतर शाळेच्या मॅनेजमेन्टने तात्काळ जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
बातम्या आणखी आहेत...