आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये राजकीय नेत्याच्या घरात स्फोट, स्वच्छता कर्मचार्‍याचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमधील जनता दलाचे (संयुक्त) नेते अभय कुशवाह यांच्या घरात आज (मंगळवार) सकाळी एक शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटात स्वच्छता कर्मचार्‍याचा मृत्यू झाला असून कुशवाह यांचे मेव्हणे गंभीर जखमी झाले आहेत. कुशवाह यांच्या घरी आलेल्या पार्सलचा स्फोट झाल्याचे मृत संतोष कुमारच्या नातेवाईकांनी सांगितले.

मिळालेली माहिती अशी की, गया जिल्ह्यातील गुजापी येथील अभय कुशवाह यांच्या घरात आज (मंगळवार) स्फोट झाला. अभय कुशवाहा यांच्या घरी एक पार्सल आले होते. स्वच्छता कर्मचारी संतोष कुमार ते उघडत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तीशाली होती की, संतोष कुमारचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे अभय कुशवाह यांचे मेव्हणे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
स्‍फोटाची माहिती मिळताच, गयाचे एसएसपी मनु महाराज यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. याप्रकरणी चौकशी सुरु करण्‍यात आली असल्याचे डीएसपी सतीश कुमार यांनी सांगितले आहे.