आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत तर्र शिक्षकाने दिले विद्यार्थ्‍यांना ‘दारू प्‍या’चे धडे ! छत्‍तीसगडमधील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळ्यावर दारू प्‍या असे लिहून शिकवताना शिक्षक. - Divya Marathi
फळ्यावर दारू प्‍या असे लिहून शिकवताना शिक्षक.
रायपूर (छत्तीसगड) – शाळेत एक शिक्षक रोज दारू ठोसून येतो. एवढेच नाही तर नशेत तर्र होऊन ‘दारू प्‍या’ असा शिकवणही फळ्यावर लिहून देतो, हा प्रकार घडला कोरिया जिल्‍ह्यातील एका शासकीय प्राथमिक शाळेत. या शिक्षकाच्‍या कारनाम्‍याचा एक व्‍हीडिओ एका पत्रकाराने काढला असून, तो व्‍हायलर झाला आहे. जिल्‍हा शिक्षण विभागाने याच्‍या चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवबरन असे या तळीराम शिक्षकाचे नाव आहे. व्‍हीडिओमध्‍ये फळ्यावर ‘दारू प्‍या’ असा संदेश लिहिताना तो दिसत आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्‍यांकडून हा शब्‍द वाचूनसुद्धा तो घेत आहे. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाने माफी मागितली असून, पुन्‍हा असा प्रकार होणार नाही, याची ग्‍वाही दिली.
कडक कारवाई होणार
जर शिवबरन हा दारू पिऊन शाळेत शिकवत असेल तर प्रकार गंभीर आहे. याची चौकशी होईल. यात जर तो दोषी आढळला तर कडक कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया कोरियाचे जिल्‍हाधिकारी संजीव झा यांनी दिली.