आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीटविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणाऱ्या मुलीची आत्महत्या, प्रवेश न मिळाल्यामुळे टोकाचे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे तामिळनाडूच्या अरियालूर येथील दलित विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तामिळनाडूसाठी नीट सक्तीचे करू नये,अशी बाजू  तिने प्रतिवादी म्हणून सर्वाेच्च न्यायालयात मांडली होती.
 
राज्याला गेल्या वर्षी देण्यात आलेली सवलत या वर्षीही वाढवण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार दिला आहे. १७ वर्षीय विद्यार्थिनी एस. अनिता शुक्रवारी घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिने राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात १२ वीत ९८% गुण मिळवले होते. मेडिसीनसाठी १९६.७५ व इंजिनिअरिंगसाठी १९९.७५ कट ऑफ गुण प्राप्त करणे आवश्यक होते. 
बातम्या आणखी आहेत...