आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Girl Who Set Ablaze Her Self Due To Eve Teasing, Ampering Troubled Girl Put Himself On Fire

छेडछाड प्रकरण:अखेर \'त्या\' मुलीचा मृत्यु, कुटुंबियांचा दिला आत्महत्येचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- पंजाबमधील संगरूर येथील छेडछाडीला कंटाळून पेटवून घेतलेल्या अल्पवयीन मुलीची प्राणज्योत अखेर मंगळवारी सकाळी मालवली. बेअंत कौर असे या मुलीचे नाव होते. बेअंतवर चंदीगडमधील पीजीआयमध्ये उपचार सुरु होते.

पोलिसांचे आरोपींसोबत साटेलोटे असल्याचा आरोप मृत पीडितेचा भाऊ जसगीर सिंह जग्‍गी याने केला आहे. आरोपींनी शिक्षा न झाल्यास संपूर्ण कुटूंब आत्महत्या करेल, असा इशारा देखील जसगीर सिंह जग्गी याने दिला आहे.

पीडितेने नोंदवला जबाब...
"आरोपी मनी खांडेवाड, मनी, स्वर्ण आणि गुरप्यार यांचे भावासोबत भांडण झाले होते. सर्व आरोपींनी भावाचा बदला घेण्यासाठी मला टार्गेट केले होते. तब्बल महिनाभरापासून ते माझी छेड काढते होते. 4 ऑगस्टला मला त्यांनी बसमधून खाली उतरवले. माझे कपडे फाडले. मारहाणही केली. बेअब्रु केले.मला जगायचे नव्हते. घरी आल्यानंतर मी स्वत:ला जाळून घेतले. मी वाचणार नाही, याची मला कल्पना आहे. परंतु, आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी", असा जबाब बेअंत कौरने नोंदवला होता.