आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 लाख रुपयांना मागितलेला हा बोकड वाचला; मालकाची लालसा पथ्‍थ्‍यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोकडाच्‍या कानाजवळ असलेले पवित्र शब्‍द - Divya Marathi
बोकडाच्‍या कानाजवळ असलेले पवित्र शब्‍द
जयपूर - देशभरात बकरी ईद उत्‍साहात साजरी झाली. त्‍या अनुषंगाने ठिकठिकाणी बोकडाचा बळी देण्‍यात आला. दरम्‍यान, 48 लाख रुपये बोली मिळालेला एक बोकड यातून वाचला आहे. 61 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीमध्‍ये तो विकणार नाही, असे त्‍याच्‍या मालकाने सांगितले होते. मालकाच हाच हट्टहास बोकडाच्‍या पथ्‍थ्‍यावर पडला.
अशी केली तयारी
या बोकडाच्‍या विक्रीसाठी त्‍याच्‍या मालकाने सर्व प्रकारची तयारी केली होती. ऑनलाइनपासून ते इतर ठिकाणी त्‍याची जाहिरात करण्‍यात आली होती. त्‍यातून तो 48 लाख रुपयांना खदेरी करण्‍याचा प्रस्‍ताव एका व्‍यक्‍तीने ठेवला होता. पण, आपण 61 लाखांपेक्षा कमी किमतीमध्‍ये तो विकणार नसल्‍याचे त्‍याच्‍या मालकाने सांगितले.

बोकडाला एक वर्ष जीवनदान
भरतपूरमध्‍ये गाजीपूरच्‍या एका बोकडाची पूर्ण यूपी चर्चा आहे. त्‍याच्‍या कानावर अल्लाह, मोहम्मद या पवित्र शब्‍दांसह अनेक मुस्‍लीम चिन्‍ह आहेत. त्‍यामुळे या बोकडाच्‍या खरेदीसाठी मुंबई, आग्रा, दौसा, फतेहपूर, जयपूरसह अनेक शहरांतून बोली लागली होती. 30 लाख रुपयांपासून लागलेली ही बोली 48 लाखांपर्यंत पोहोचली. मात्र, 61 लाखांपेक्षा कमी किमतीमध्‍ये तो विकणार नसल्‍याचे त्‍याच्‍या मालकाने सांगितले. त्‍यामुळे आणखी एक वर्ष या बोकडाला जीवनदान मिळाले आहे.
पुढील स्‍लाइड्वर वाचा बकऱ्याला ठेवले जाते वातानुकूलित खोलीत
* का लागली एवढी बोली?
* पंजाबमधील बोकडाला मिळाला सर्वाधिक भाव
* ऑनलाइन विक्रीचे दोन फायदे