आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Leader Who Unite Nation, Not Disturbing Nitishkumar

देशाला जोडणारा नेता हवा, तोडणारा नको - नितीशकुमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - देशाला तोडणारा नेता नको तर जोडणारा नेता हवा. आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा असेल तर निष्कलंक नेता हवा असे भाजपला स्पष्टपणे सांगण्यात आले होते, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. हा आघाडीचा काळ असून भाजपला एकट्यालाच नव्हे तर रालोआलाही बहुमत मिळण्याची शक्यता नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीशकुमार यांनी भाजपशी झालेला काडीमोड, सध्याची राजकीय परिस्थिती, मोदींच्या नेतृत्वावर सविस्तर भाष्य केले. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व भाजपने मोदींकडे सोपवल्यानंतर नाराज झालेल्या जनता दल युनायटेडने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपसोबतची 17 वर्षे जुनी युती तोडण्यात आली. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी व्यक्त केलेली ही मते. मोदींचा नामोल्लेख टाळून ते म्हणाले, भाजपमध्ये व्यक्तिकेंद्रित वातावरण तयार करण्यात आले. नंतर आमच्या नावाने ओरड करण्यात येत आहे. परंतु त्यामागचा अजेंडा काय आहे हे लोकांच्याही लक्षात आलेले आहे.


बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा नरेंद्र मोदींवर हल्ला
मोदींच्या प्रशंसेबद्दल
सन 2003 मध्येही मी गुजरात दंगलीबाबत बोललो होतो. मोदींचे कौतुक केले ते रालोआ सरकारचा एक भाग म्हणून. 2005 व 09 मध्ये बिहारमध्ये निवडणुका झाल्या. तेव्हा मोदींना प्रचारासाठी का बोलावले नाही?
भाजप भरकटला
रालोआच्या मूळ मुद्द्यावरून भाजप भरकटला आहे. वाजपेयींच्या काळात 24 पक्ष होते. सन 2004 व 09 मध्ये नेता निवड करण्यात आली. परंतु मोदींप्रमाणे ‘ताजपोशी ’करण्यात आली नव्हती.
भाकीत
हा आघाडीचा काळ आहे. भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाहीच; परंतु रालोआलाही सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मोदींचे नाव पुढे करून भाजपने विनाकारण वाद उभा केला आहे.