आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध बहिणीसाठी या भावाने दिवसरात्र केली मेहनत, मग दिले असे गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावाने स्वत: उपाशी राहून मजुरी काम केले अन् बहिणीला टॉयलेटची भेट दिली. - Divya Marathi
भावाने स्वत: उपाशी राहून मजुरी काम केले अन् बहिणीला टॉयलेटची भेट दिली.

वाराणसी - येथे मजुरी करणाऱ्या एका भावाने रक्षाबंधनच्या निमित्ताने आपल्या बहिणीला टॉयलेट (स्वच्छतागृह) गिफ्ट देऊन (भाऊ नंबर 1)चा पुरस्कार पटकावला आहे. प्रशासनाकडून त्याला नुकतेच टॅब्लेट आणि प्रमाणपत्र पुरस्कार स्वरूप देण्यात आले आहेत. 

>सहायक जिल्हा पंचायत अधिकारी धीरेंद्र कुमार म्हणाले, \"8 प्रभागांत \'भाई नंबर -1\' उपक्रम राबवला होता. 140 जणांचे अर्ज यात आले होते. लॉटरी सिस्टिममध्ये मुन्नाचे नाव सर्वात आधी निघाले, त्याला टॅब्लेट पुरस्कारात देण्यात आले आहे.\"

 

6 महिने ओव्हर टाइम, उपाशी राहून केले काम
- बडागाव येथे राहणारा मजूर मुन्ना म्हणाला, बहीण नगिना मोठी झाली होती आणि टॉयलेटसाठी तिला बाहेर जावे लागत होते. एखादा अपघात, अनर्थ होऊ नये असा विचार करून मी 5-6 महिने ओव्हर टाइम करून उपाशी राहून काम केले. रक्षाबंधनच्या सुटीला गावी येऊन मिस्त्रीसोबत स्वत: मजूर बनून टॉयलेटचे बांधकाम केले.\"
- यादरम्यान सरपंचांनी या उपक्रमाची माहिती दिली. आणि त्यांनीच या उपक्रमासाठी माझे नाव पाठवले होते.

 

भावाने पूर्ण केले वचन
- बहीण नगिना म्हणाली, मी डोळ्यांनी पाहू शकत नाही, जेव्हा टॉयलेटसाठी बाहेर जायचे तेव्हा भीती वाटायची. भय्याने 4 महिन्यांपूर्वी वचन दिले होते की, रक्षाबंधनला तुला काही तरी खास गिफ्ट देईन. रक्षाबंधनच्या काही दिवसांपूर्वीच भाऊ सुरतहून परत आला आणि स्वत: त्याने टॉयलेटचे बांधकाम केले.\"

- आई हिरावती म्हणाली, नगिना 4 वर्षांची होती, तेव्हा तिच्या डोळ्यात इंफेक्शन झाले होते. हॉस्पिटलमधून ड्रॉप घेऊन ते टाकले. पण हळूहळू तिला दिसेनासे झाले. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टर म्हणाले की, कोणता तरी पडदा फाटला आहे. उपचारांसाठी 4 लाखांचा खर्च येईल. आजपर्यंत तिचे ऑपरेशन होऊ शकलेले नाही. मागच्या वर्षी 2016 मध्ये माझ्या पतीचेही निधन झाले.
- मुन्ना आपल्या बहिणीच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी परत सुरतला गेला आहे. तिथे तो मजुरी काम करतो.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...