आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१३ हजार किमीचा सायकल प्रवास,२०७ दिवस प्रवास करून घेतले १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवादा- भगवान शंकराच्या भक्तीत बुडालेल्या एका व्यक्तीने सुमारे २०७ दिवस १३ हजार किलोमीटरचा चक्क सायकलने प्रवास करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण केली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी बिहारच्या नवादा जिल्ह्यातील बेलदारी या गावात एक शिवलिंग सापडले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याची जबाबदारी भक्तीमार्गाला लागलेले उदय कुमार यांच्यावर सोपवली. यासाठी गावकऱ्यांनीही मदत करण्याचे आश्वासन दिले. उदय कुमार निष्ठेने मंदिर बांधकामासाठी झटू लागले. मात्र, हळूहळू लोक माघार घेऊ लागले. उदय यांनी लोकांना एकत्र आणण्याचे खूप प्रयत्न केले. स्वत:ची आर्थिक स्थितीही चांगली नसल्याने उदय मंदिर बांधकामासाठी काही करू शकत नव्हते. कसेतरी पै-पै जोडून त्यांनी मंदिराचा पाया रचला. त्यानंतरही अडचणी कायमच असल्याने त्यांनी देशातील बाराही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला.

२०७दिवसांत १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन :४५ वर्षीय उदय कुमार २५ नोव्हेंबर २०१५ रोजी सायकलने त्यांच्या गावातून निघाले आणि नुकतेच २० जून रोजी परत आले. झारखंडच्या वैजनाथ धाम मंदिरापासून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली आणि उत्तर प्रदेशच्या काशी विश्वनाथ मंदिरात या प्रवासाची सांगता झाली. दरम्यान, त्यांनी १३ हजार किलोमीटरचा सायकलने प्रवास केला. यासाठी त्यांना हजार ५०० रुपये खर्च आला. उदय कुमार यांच्या जिद्दीपुढे लोकांचे मनही परावर्तित झाले. गावी आल्यानंतर लोकांनी उदय कुमार यांचे जंगी स्वागत तर केलेच. सोबत, मंदिराच्या बांधकामासाठीही पुढाकार घ्यायला सुरुवात केली.

काशी मास्टर, चंदाविगहा आदी शेजारच्या गावांतूनही त्यांना मदतीचा ओघ सुरू आहे. आता मंदिराचे बांधकामही सुरू झाले आहे.

पश्चात्तापाने निर्णय
मंदिर बांधूशकत नसल्याने मला पश्चात्ताप होऊ लागला होता. त्यामुळे मी ज्योतिर्लिंग दर्शनाचा निर्णय घेतला. आता मंदिरासाठी लोक मदत देत आहेत. त्यांनाही पश्चात्ताप होत आहे. उदयकुमार
बातम्या आणखी आहेत...