आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपलचे सुरु होत व्हॅलेंटाइन सेलिब्रेशन, भाऊजीने प्रियकराला चौथ्या मजल्यावरुन फेकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या विवाहित व्यक्तीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. आरोप आहे, की तरुणीच्या कुटुंबियांनी मृत ईश्वरला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तरुणीचा रमेश भाऊजी आणि त्याचा ड्रायव्हर अनिल याला अटक केली आहे.

तरुणीने पोलिसांना सांगितले, फेसबुकवर झाली होती भेट
तरुणीने सांगितले, की आठ वर्षांपूर्वी तिची ईश्वरसोबत फेसबुकवर ओळख झाली आणि नंतर मैत्री. नियमीत गाठीभेटी होऊ लागल्या आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करु लागलो.
व्हॅलेंटाइन डेच्या निमीत्ताने दोघांनी तरुणीच्या फ्लॅटवर भेटण्याचे ठरवले. मृत ईश्वर विवाहित होता. त्याने पत्नीला सरप्राइज देतो असे सांगितले, आणि घराबाहेर पडला होता.
दोघे फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हाच, तरुणीचा मानलेला भाऊजी आणि त्याचा एक मित्र तिथे दाखल झाले.
फ्लॅटमध्ये दोघांने एकटे पाहून रमेशचा पारा चढला आणि तो ईश्वरला शिवीगाळ करु लागला. दोघांमध्ये धरपकड झाली.
या दरम्यान, तरुणीचा मानलेला भाऊजी आणि त्याच्या मित्राने ईश्वरला बालकनीतून खाली ढकलून दिले.

डोक्याला मार लागल्याने मृत्यू
चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर ईश्वरच्या डोक्याला जोरदार मार बसला. मात्र त्याच्या शरीरावर इतरत्र कुठेही जखम झाली नव्हती, किंवा रक्तही निघाले नाही. त्याला खाली फेकल्यानंतर तरुणीसह अनिल आणि रमेश धावत खाली आले. त्यांनी त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांना या तिघांच्या बोलण्यावर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांनाही खोटी कथा सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा तरुणीने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो