आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगरेप करून गेला जेलमध्ये, सुटका झाल्यानंतर तिच्यावरच पुन्हा केला Rape

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - गँगरेप केसमधून सुटका होण्यासाठी आरोपीने पीडितेशी लग्न केले. पुन्हा जेलमधून सुटल्यावर दुसऱ्यांदा मित्रांसह पीडितेवर गँगरेप केला. यानंतर पीडितेने सात महिन्यांपर्यंत पोलिस आणि प्रशासनाकडे खेटा मारल्या पण तिची कोणीच दखल घेतली नाही. सात महिन्यांनंतर आयजीपर्यंत प्रकरण पोहोचल्यावर गँगरेपची तक्रार दाखल झाली. या प्रकरणात डीसीपी ध्रुमन निंबले यांचे म्हणणे आहे की, प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.
 
आत्महत्येचा केला प्रयत्न
- सूत्रांनुसार, जोधेवाल पोलिसांनी न्यू कैलाश नगरच्या हॅपी, त्याचा भाऊ अरुण विज आणि विक्की विज यांच्याविरुद्ध भादंवि 376-डी, 427, 506, 120-बी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
- याआधी जोधेवाल पोलिस आणि वुमन सेलने पीडितेला खेटा मारायला लावल्या होत्या आणि पोलिसांनी फक्त हुंड्याची तक्रार घेतली होती.
- यानंतर महिलेने पाच वेळा डीजीपी आणि दोन वेळा पोलिस आयुक्तांचीही भेट घेऊन तक्रार दिली होती.
- जोधेवाल पोलिसांनी मात्र असे कुठलेच प्रकरण नसल्याचे सांगून फाइलच बंद केली होती.
- यामुळे नैराश्य येऊन पीडितेने उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, काय होते पूर्ण प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...