आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडाने दुकानात घुसून वृद्ध दाम्पत्याला झोडपले, हात फ्रॅक्चर-दात तुटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुकानात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करताना तरुण. - Divya Marathi
दुकानात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करताना तरुण.
चंदीगड (पंजाब) - भर बाजारातील एका दुकानात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करण्याचे प्रकरण समोर आले आहे. एका गुंडाने या वृद्ध दाम्पत्याच्या दुकानात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात वृद्धाचा हात फ्रॅक्चर झाला तर, त्यांच्या पत्नीचा दात तुटला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतल्या जात आहे.

कुठे झाली घटना
चंदीगडच्या सेक्टर 18 मध्ये एका वृद्ध दाम्पत्याचे मोबाइल शॉप आहे. बुधवारी राजीव नावाचा एक गुंड प्रवृत्तीचा तरुण त्यांच्या दुकानात आला. तो त्यांच्या शेजीर राहातो.

दुकानात शिरल्याबरोबरत त्याने दोघांनाही मारहाण सुरु केली. मारहाणीत वृद्ध दुकानदाराचा हात फ्रॅक्चर झाला तर त्यांची पत्नी संतोष कुमारी यांचा दात तुटला. ज्यावेळी वृद्ध दाम्पत्याला मारहाण होत होती तेव्हा लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व घटना कैद झाली. गुरुवारी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला.

वृद्ध दाम्पत्याने राजीव विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिकारी सुखचैन सिंग यांनी मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचे सांगितले. वृद्धांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. आरोपीवर कडक कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील स्लाइडमध्ये, मारहाणीचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...