आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन मुलांच्या आईसोबत प्रियकराचे शारिरिक संबंध, नंतर समोर आले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- येथे एका आठवड्यानंतर सापडलेल्या बेपत्ता महिलेचा मृतदेहामागील रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने केवळ हत्येचे कारण नाही सांगितले तर, त्या दिवसीचा संपूर्ण घटनाक्रम त्याने पोलिसांपूढे कबूल केला. आरोपीने सांगितले की, घटनेच्या दिवशी त्याने महिलेला फूस देऊन घटनास्थळी नेले, तिथे तिच्यासोबत शारिरिक संबंध बनवले आणि त्यानंतर जेव्हा ती विश्वासात आली तेव्हा गळा दाबून तिची हत्या केली.

 

असे आहे संपूर्ण प्रकरण....
- पोलिसांनी सांगितले की लाऊ येथील रहिवाशी रामानारायण बडा याचे गावातीलच  पतियारो अरांव हा महिलेशी 2007 पासून प्रेमसंबंध सूरू होते.
- दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. या दरम्यान लग्नाशिवाय त्याना दोन मुलं देखील झाले. दोन वर्षांपासून रामनारायण पतियारोपासून दूर राहत होता. पतियाराला कळाले की रामनारायणने दिसऱ्या महिलेशी लग्न केले आहे.
- त्यानंतर तिने कोर्टात पोटगीसाठी मागणी केली. यामुळे रामनारायन तिचावर नाराज झाला होता. 1 ऑक्टोबरला संध्याकाळी पतियारोची रामानारायणने गावातच भेट घेतली. तिला विश्वासात घेऊन घटनास्थळी घेऊन गेला आणि तिच्यासोबत शारिरिक संबंध बनवले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली.

 


घरी जाऊन नातेवाईकांना सांगितले...
- पतियारोचा हत्या केल्यानंतर रामनारायण आपल्या घरी गेला आणि कुटुंबांतील सदस्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
- यानंतर रामनारायण, त्याचे वडिल, आई, बहिन आणि मावशीचा मुलगा याच्या मदतीने पतियारोचा मृतदेह एका प्लॅस्टीकच्या थैलीत भरला आणि बाईकवरून झिंगो जंगलात नेऊन एका नाल्याजवळ नेऊन तेथे गाडून टाकला.
- प्रकरण जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा सर्वात आधी रामनारायनला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आधी त्याने याविषयी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच, त्या दिवशी घडलेला संपूर्ण घटनाक्रम त्याने पोलिसांना सांगितला. परंतु, त्यानंतरही मतदेह कुठे आहे, हे दाखवण्यासाठी त्याने पोलिसांना तीन दिवस फिरवले.
- पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून पतियारोच्या वडिलांकडे सोपवला. हत्ये प्रकरणी पोलिसांनी रामनारायणसह त्याचे वडिल भोदरो, आई गांगी बाई, बहिन सोनामती आणि मावस भाऊ रूपनारायण यांना अटक केली आहे.


फोटो : विश्वास गुप्ता
पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधित आणखी फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...