आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजयीला शरीरसुखासाठी मजबूर करायचा दीर, हत्येनंतरही मृतदेहासह केले हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्गादेवीची हत्या दीर राजू उदेनिया यानेच केली. - Divya Marathi
दुर्गादेवीची हत्या दीर राजू उदेनिया यानेच केली.

अजमेर - सुभाषनगर परिसरातील दुर्गादेवी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. जिवंत असताना भावजयीकडून शरीरसुख मिळवू शकला नाही, म्हणून दिराने तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहासोबत आपली वासना शमवली. आरोपी एवढा चलाख होता की, खुनानंतरही तो इतर कुटुंबीयांसह भावजयीच्या अंत्ययात्रेत सामील झाला आणि पोलिस कारवाईतही उपस्थित होता. 


शरीरसुखासाठी घेतला जीव...
> दुर्गादेवी यांचा खून झाला होता. त्यांना जिवे मारणारा तिचा दीर राजू उदेनियाच होता. वासनांध झालेल्या दिराची नियत अनेक दिवसांपासून बिघडलेली होती. ते आपल्या भावजयीलाच संबंध ठेवण्यासाठी मजबूर करत होता.
> 27 नोव्हेंबर रोजी रात्रीही मोबाइलमधून त्याने दुर्गादेवीला फोन केला. 28 नोव्हेंबरला दुर्गादेवीचा पती आणि नणंद कामावर बाहेर गेले तेव्हा घरात भावजयीला एकटी पाहून त्याने बळजबरी तिच्यासोबत संबंध बनवण्याचा प्रयत्न केला. दुर्गादेवीने त्याला विरोध केल्यावर चिडून त्याने त्यांचा गळा दाबून खून केला.
> एवढ्यावरच राजू शांत झाला नाही, त्याच्या डोक्यातील वासनेचे भूत उतरले नव्हते. त्याने आपल्या भावजयीच्या मृत शरीराशी संबंध बनवले. आरोपी राजू मृत महिलेचा सख्खा दीर नव्हता. तो दुर्गादेवीच्या पतीचा चुलत भाऊ होता.

>आईवडिलांच्या निधनानंतर राजू नातेवाइकांच्या आसऱ्यानेच राहत होता. मागच्या अडीच वर्षांपासून तो दुर्गा यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते.
> राजू बिगारी काम करतो आणि अविवाहित आहे. काही दिवसांपासून तीन मुलांची आई असलेल्या भावजयीवर त्याची वाईट नजर होती. आपली वासना पूर्ण करण्यासाठी त्याने अनेकदा भावजयीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. दुर्गादेवीनेही दिराच्या या कृत्याचा उल्लेख आपल्या पतीकडे कधीच केला नव्हता.

 

असा सापडला आरोपी...
> सूत्रांनुसार, 28 नोव्हेंबर रोजी सुभाषनगरमध्ये दुर्गादेवीचा मृत्यू झाला. पती बुधराज यांच्या माहितीवरून मृत विवाहितेचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.
> घरच्यांनी जबाब दिला की, दुर्गा देवीने फाशी घेऊन आत्महत्या केली. पोलिस ही केस आत्महत्येची समजूनच तपास करत होते. परंतु, महिलेच्या गळ्यावर आणि इतर जागी ओरखडल्याच्या खुणांमुळे या प्रकरणात संशय निर्माण झाला.
> एसपी राजेंद्रसिंह चौधरी यांच्या आदेशावरून आयपीएस मोनिका सेन, स्टेशन इंचार्ज अजयकांत रतुडी, हरिपाल सिंह आणि इतर अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे परीक्षण केले आणि घटनास्थळाचा बारकाइने तपास केला तेव्हा हे प्रकरण हत्येचे आढळले. या दिशेने पोलिसांनी तपास केला असता मृत महिलेच्या मोबाइल कॉल डिटेल्समधून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. घटनेच्या आदल्या रात्री तिच्याशी 3 वेळा फोनवर संपर्क करणारा तिचा चुलत दीर राजूच होता. राजूच्या मोबाइलची लोकेशन सकाळी साडे 9 ते साडे 10 पर्यंत त्याच जागी होती, जेथे दुर्गादेवीचा खून झाला होता.
> यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याही गळ्यावर वर आणि डोळ्यावर नखांनी ओरखडल्याच्या खुणा आढळल्या. यावरून पथकाने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच राजू मोडून पडला आणि त्याने गुन्हा कबूल केला.

> याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दीर राजूला अटक केली असून अधिक तपास व कारवाई सुरू असल्याचे म्हटले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...