आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या फोटोत दडले आहे तरूणीच्या मृत्यूचे कारण, पाहून प्रियकराने केली हत्या...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत लोकेश्वरीच्या गळ्यात दुसऱ्या तरूणाने दिलेले मेडल पाहून आरपीने केली हत्या... - Divya Marathi
मृत लोकेश्वरीच्या गळ्यात दुसऱ्या तरूणाने दिलेले मेडल पाहून आरपीने केली हत्या...

बालोद (छत्तीसगड)-तीन दिवसांपूर्वी 12वीच्या विद्यार्थीनीने केलेल्या आत्महत्येचा उलगडा कऱण्यात पोलिसांना यश आले आहे. ही आत्महत्या नसून हत्या आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपी प्रियकराने हत्येचे कारण बेवफाई असल्याचे सांगितले आहे. प्रेयसीच्या गळ्यात दुसऱ्या तरूणाने दिलेले लॉकेट पाहून तिची हत्या केली असे आरोपीने सांगितले आहे.

 

असे आहे प्रकरण...
- सदर घटना ही 24 जिसेंबर रोजी घडली होती. गुंडरदेहीच्या अर्जुन्दा क्षेत्रात 12वीत शिकणरी विद्यार्थीनी लोकेश्वरी साहू हीचा मृतदेह शुक्रवारी तिच्या घरी शाळेच्या ड्रेसमध्ये फाटलेल्या ओढणीसोबत फासावर लटकलेला आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकऱणाची चौकशी केली तेव्हा शेजारी राहणार्या संतोष साहू या तरूणाने तिची हत्या केल्याचा खुलासा झाला.


अशी आहे कहानी....
- पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, लोकेश्वरीचे आरोपी संतोषसोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधी होते. तो तिच्या घरासमोरच राहत होता. दोघेही एकाच जातीचे होते आणि आरोपी संतोषला तिच्याशी लग्न कारायचे होते. परंतु, काही दिवसांपूर्वी लोकेश्वरीचे तिच्या मैत्रीणीच्या भावीशी अफेअर सुरू झाले. तो क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे. त्याने एका टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच चे मेडल जिंकले आहे. त्याने हे मेडल आपल्या बहिणीच्या माध्यमातून लोकेश्वरीला गिफ्ट केले होते.
- लोकेश्वरी हे मेडल गळ्यात घालून फिरत होती. घटनेच्या दिवशी साडेचार वाजता ती शाळेतून घरी परतली आणि बॅग ठेऊन जेवणाचे ताड हातात घेतले, तेव्हा समोर आरोपी उभा होता. त्याने घरात प्रवेश करून दरवाजा आतून बंद केला आणि तिच्याशी लग्नासाठी अग्रह करू लागला. लोकेश्वरी म्हणाली की तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी मरून जाणे पसंत करेल. तेव्हा विद्यार्थीनी शाळेच्या गणवेशातच होती. तिच्या गळात दुसऱ्या प्रियकराने दिलेले मेडल देखील लटकवलेले होते. हे पाहून आरोपीला राग आला.


अशी हत्या करून लटकवले...
- त्यानंतर थोड्या आरोपीने लोकेश्वरीला मारहाण करण्यास सूरुवात केली त्याने तिचे डोके जमीनीवर आदळले, यामुळे तिच्या डोक्यावर आणि नाकामध्ये जखम झाली. ती अर्धमेल्या स्थितित होती. ती जिवंत राहू नये म्हणून आरोपीने तिच्या ओढणीने तिच्या गळा आवळला आणि तिला छताला लटकवून दिले. त्यानंतर आरोपी घराच्या भींतीवरून उडी मारून पळून गेला. या दरम्यान घरात कोणीच आले नाही. दहा मिनिटे विद्यार्थीनी गळफासावर तडपत लटकलेली होती. त्यानंतर दम कोंडल्याने तिचा मृत्यू झाला.


मैत्रीणीने दिला पोलिसांना पूरावा...
पोलिसांनी सांगितले की, मृत विद्यार्थीनीची मैत्रीन तिला शाळेत घेऊन जाण्यासाठी जेव्हा घरी पोहोचली होती, तेव्हा देखील आरोपी घरात होता आणि तिच्याशी भांडण करत होता. तेव्हा आरोपीने तिला तेथून जाण्यासाठी सांगतिले आणि महत्वाचे बोलत असल्याचे म्हणाला. यावरून विद्यार्ती आरोपीवर रागवली, ती का जाईल, तु कोण आहे तिला असे बोलणारा असे लोकेश्वरीने त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर तो तेथून निघून गेला. याच आधारावर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.


पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधीत आणखी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...