आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Man Suicide Attempt In Haryana Secretariat Parking In Chandigarh

माजी सैनिकाची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये लिहिले, पोलिस करतो मुलीवर बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्या केलेले माजी सैनिक संदीप - Divya Marathi
आत्महत्या केलेले माजी सैनिक संदीप
चंदीगड (हरियाणा) - राज्याच्या सचिवालयाच्या पार्किंगमध्ये बुधवारी एका माजी सैनिकाने विष प्राशन केले. त्याला गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. माजी सैनिकाजवळ एक सुसाइड नोट सापडली. त्यात त्याने पोलिस माझ्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत असल्याचा गंभीर आरोप केला. पोलिसांच्या अत्याचाराला विरोध करता येत नसल्यामुळे नाइलाजाने आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटले आहे. माजी सैनिकाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सुसाइड नोटमध्ये केली आहे.

आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकाने दुसऱ्या पत्नीवर केले आरोप
- पोलिसांना सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे, माझे नाव संदीप आहे. मी हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहे. पहिल्या पत्नीचे निधन झाले असून तिच्यापासून एक मुलगी आहे. माझ्या दुसऱ्या पत्नीचे एका पोलिसासोबत अनैतिक संबंध आहेत आणि तो माझ्या अल्पवयीन मुलीवर कित्येक महिन्यांपासून बलात्कार करत आहे.
- या प्रकरणाची मी कुठे वाच्यता केली माझा एन्काउंटर करण्याची धमकी पोलिसाने दिली आहे. त्यामुळे मी काहीही करु शकलो नाही. या प्रकरणाचा सीबीआय मार्फत तपास केला जावा.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुसाइड नोट..