आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Muslim Who Does Not Vote For SP Is Not A Real Muslim Abu Azami

मुलायमसिंह मुस्लिमांचे पोप आहेत का? त्यांना जन्नतमध्ये नेणार का? भाजपचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- जे मुस्लिम समाजवादी पक्षाला मतदान करीत नाहीत ते खरे मुस्लिम नाहीत. त्यांची डीएनए चाचणी घ्या, असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. दुसरीकडे, आझमी यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते शाहनवाज हुसैन यांनी हल्लाबोल केला आहे. आझमींना त्यांनी विचारले आहे की, मुलायमसिंह मुस्लिमांचे पोप आहेत का? आणि ते मु्स्लिमांना 'जन्नत'मध्ये घेऊन जाणार आहेत का?
आझमी सध्या यूपीत पक्षाच्या प्रचारासाठी गेले आहेत. महाराष्ट्रातील निवडणूका झाल्याने रिकामे झालेले आझमी सध्या उत्तर प्रदेशात स्टार प्रचारक बनले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीतील पक्षाचा चेहरा अशी ओळख असल्याने आझमींना पक्षातही महत्त्व आहे. त्यामुळेच गुरुवारी यूपीतील खालिदाबाद येथे पक्षाचे उमेदवार भालचंद्र यादव यांच्यासाठी झालेल्या जाहीर सभेत आझमी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने आझमी यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
आझमी या सभेत म्हटले, की मुस्लिमाचे भले करणारा देशात एकमेव पक्ष आहे. तो म्हणजे समाजवादी पक्ष. समाजवादी पक्षाने व पक्षाच्या अध्यक्षांनी (मुलायम सिंहांनी) मुस्लिमांसाठी काय केले नाही? तरीही मुस्लिम सपाला मतदान देणार नसतील तर त्यांच्या डीएनएची तपासणी करायला हवी. त्यांचा संघाशी काही संबंध आहे का ते तपासायला हवे. जेणे करून ते खरे मुस्लिमच आहेत का ते कळेल असे वक्तव्य केले. त्यामुळे यूपीतील शेवटच्या टप्प्यात हिंदू-मुस्लिम मतांचे धुव्रीकरण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.
अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांना फाशी द्या, म्हणाले होतो आझमी...वाचा पुढील स्लाईडवर