आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेयान स्कूल: मर्डरनंतर लगेच शूट केलेला VIDEO, टॉयलेटपासून व्हरंड्यापर्यंत सांडलेले होते रक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रद्युम्नचे खुनानंतर लगेच हा व्हिडिओ एका जागरूक पालकाने शूट केला. - Divya Marathi
प्रद्युम्नचे खुनानंतर लगेच हा व्हिडिओ एका जागरूक पालकाने शूट केला.
गुडगाव - गुडगावच्या रेयान इंटरनॅशनल शाळेत 7 वर्षीय मुलाचा खून झाल्यानंतर लगेच शूट केलेला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ स्पष्ट दिसतेय की, कशा प्रकारे शाळेच्या टॉयलेट आणि त्याच्या आसपास रक्त सांडलेले होते.
तथापि, हा व्हिडिओ शाळेच्या रिसेप्शनमध्ये उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याचे पालक सुभाष गर्ग यांनी शूट केल्याचे सांगितले जात आहे. 
 
गळा चिरून केला होता निर्घृण खून...
गुडगावच्या रेयान इंटरनॅशनल शाळेत शुक्रवारी (8 सप्टेंबर) रोजी 7 वर्षीय मुलाचा खून करण्यात आला होता. डेडबॉडीही टॉयलेटमध्ये आढळली होती. याप्रकरणी पोलिसांनी स्कूलबसचा कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. आरोपी अशोक 8 महिन्यांपूर्वीच शाळेत नोकरीवर लागला होता.
- अशोकने मीडियाला सांगितले की, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या टॉयलेटमध्ये गेलो होतो. तिथे घाण काम करत होतो. तेवढ्यात मुलगा तेथे आला. त्याने मला पाहिले. मी अगोदर त्याला धक्का दिला. मग ओढले. तो ओरडायला लागल्याने मी घाबरलो. मग मी त्याच्यावर चाकूने दोन वार केले. त्याचा गळा चिरला.
 
काय म्हणतात पोलिस?
रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी 7 वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती. त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. डॉक्टरांच्या टीममधील डॉ. दीपक माथूर म्हणाले, मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले नाही. त्याच्या गळ्यावर चाकूचे दोन वार होते. दरम्यान, आरोपी अशोकची चौकशी पूर्ण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याने खून केल्याचे कबूल केले असल्याचे पोलिस आयुक्त बिरमजीत सिंह यांनी सांगितले. गुडगावमधील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी (8 सप्टेंबर) सकाळी शाळेच्या टॉयलेटमध्ये दुसरीतील मुलाचा मृतदेह सापडला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. रेयान ग्रुपच्या देशभरात 130 पेक्षा जास्त शाळा आहेत.
 
पोस्टमॉर्टम आणि पोलिस तपासात काय समोर आले...
- डॉक्टर म्हणाले, मुलाच्या गळ्यावर चाकूचे निशाण होते. 
- त्याआधी पोलिस आयुक्त सिंह म्हणाले, 'बस कंडक्टर अशोकने गुन्हा कबूल केला आहे. हत्येत दुसरा कोणीही सहभागी नव्हता. पोलिसांची चौकशी पूर्ण झाली आहे. मुलाची हत्या अशोकनेच केली असल्याचे सिद्ध होत आहे. अशोक आधीच टॉयलेटमध्ये होता. त्यानेच मुलाचा खून केला. शाळेची या प्रकरणातील भूमिका हा वेगळा विषय आहे.' 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...