आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कैद्याचा गूढ मृत्यू; बिहारमध्‍ये नातेवाइकांचा रास्ता रोको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेहानाबाद (बिहार) - येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याला तुरुंग प्रशासनाने सदर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. नातेवाइकांना ही माहिती समजताच त्यांनी रुग्णालयाबाहेर संतप्त निदर्शने केली.
 
त्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी या मागणीसाठी नातेवाइकांनी पाटणा-गया महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाहने रोखली होती.  
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत भूषण श्रीवास्तव यांनी सांगितले, अर्जुन यादव (३०) हा कैदी एप्रिल २०१७ पासून जेहानाबादच्या जिल्हा कारागृहात खुनाच्या अारोपाखाली शिक्षा भोगत आहे. तो शनिवारी रात्री  अज्ञात कारणामुळे दगावला. त्याला तुरुंग प्रशासनाने येथील रुग्णालयात तातडीने उपचारासाठी आणले होते. डाॅक्टरांनी त्याचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचे कारण दिले आहे. यादवच्या मृत्यूची चौकशी करण्यात येईल, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
 
यादव याचा मृत्यू झाल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने त्याच्या नातेवाइकांना कळवली. त्यांनी तत्काळ सदर रुग्णालयात धाव घेतली. नातेवाइकांनी त्याचा खून झाल्याचा  आरोप करत चौकशीची मागणी केली. त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केेले.
बातम्या आणखी आहेत...