आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आधी पाहिला नसेल असा अपघात, काळीज पिळवटून टाकणारे दृश्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेवाडी - रेवाडीमध्ये गुरुवारी सकाळी 5 वर्षीय एका मुलाला खासगी कंपनीच्या बसने चिरडले. घटनेच्या वेळी मुलाचे वडील त्याला शाळेत सोडायला जात होते. बसचे चाक डोक्याच्या वरून गेल्याने मांसाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले पाहून प्रत्येक जण सुन्न झाला होता. यानंतर संतप्त लोकांनी बसच्या काचा तोडून तिला आगीच्या हवाली केले. दुसरीकडे, गर्दीचा संताप एवढा वाढला की, त्यांनी पोलिसांशीच दोन हात केले.
 
साडेतीन चक्का जाम, पोलिसांना करावा लागला बळाचा वापर
- मिळालेल्या माहितीनुसार, येथील सुनील कुमार यांचा 5 वर्षांचा मुलगा यख्श शहराच्याजीझस किड्स स्कूलच्या केजीमध्ये शिकतो. अपघाताच्या वेळी सकाळी साडेसात वाजता सुनील कुमार त्यांच्या मुलाला सोडायला जात होते.
- त्यांच्या मागे मोटारसायकलवर शेजारच्या दोन मुलीही होत्या. मोटारसायकल सर्क्युलर रोडवर येताच एका खासगी कंपनीच्या भरधाव बसने त्यांना धडक दिली.
- धडकेनंतर सुनील कुमार आणि दोन मुली दुसऱ्या बाजूला जाऊन पडले, तर यशचे डोके बसच्या चाकांखाली आले.
 
काळीज पिळवटून टाकणारे दृश्य
- बसचे चाक डोक्यावरून गेल्यान मांसाचे तुकडे रस्त्यावर पसरले होते.
- गर्दी वाढत असल्याचे पाहून बस ड्रायव्हर बस पुढे पळवली आणि थोड्या अंतरावर जाऊन बसमधून उडी मारून फरार झाला. यानंतर लोकांचा संताप दिसून आला. बस उलटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, यानंतर काचा तोडून बसला आग लावण्यात आली.
- घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिस अधिकाऱ्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व कारवाईच्या मागणीवर अडून राहिले. 
 
ड्रायव्हरचा शोध घेताहेत पोलिस
- दरम्यान, लोकांचा संतप्त विरोध पाहून पोलिसांनी हलका लाठीचार्ज केला, मग कुठे पोलिसांना तपास सुरू करता आला. परंतु, तरीही संतप्त जमावाने रोड ब्लॉक केला. यानंतर डीएसपींनी लोकांची समजूत घालून रस्ता मोकळा केला. साडेतीन तास हा रोड जाम करण्यात आला होता.
- याबाबत डीएसपी गजेंद्र कुमार म्हणाले की, बसच्या माध्यमातून ड्रायव्हरची ओळख पटवली जात आहे. लोकांची समजूत घालून शांत केले आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...