नोएडा- महाराष्ट्र सरकार मुंबईजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० फूट उंचीचा पुतळा उभारणार आहे. या पुतळ्याची प्रतिकृती नोएडात तयार करण्यात आली आहे. प्रख्यात इतिहास तज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांनी पुतळ्याचे प्रमुख शिल्पकार राम सुतार आणि सुतार यांचे चिरंजीव तथा शिल्पकार अनिल सुतार यांच्यासह रविवारी या प्रतिकृतीची पाहणी केली.