आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघा: बीटिंग द रिट्रिटमध्ये पाकच्या वतीने समोर आला शीख जवान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघा बॉर्डरवर रिट्रिट सेरेमनीमध्ये पाकिस्तानच्या वतीने सहभागी झालेला जवान अमरजितसिंग - Divya Marathi
वाघा बॉर्डरवर रिट्रिट सेरेमनीमध्ये पाकिस्तानच्या वतीने सहभागी झालेला जवान अमरजितसिंग
अमृतसर - वाघा बॉर्डरवर प्रत्येक दिवशी होणाऱ्या बीटिंग द रिट्रीट सेरेमनीसाठी पाकिस्तान रेंजर्सने एका शीख जवानाचा समावेश केले आहे. गुरुवारी हा जवान समोर आल्यानंतर दोन्ही देशांच्या लोकांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.

कोण आहे हा जवान
- बीटिंग रिट्रीटमध्ये पाकिस्तानच्या वतीने भरती करण्यात आलेल्या जवानाचे नाव अमरजीतसिंग आहे.
- अमरजीत गुरुनगरी ननकानासाहिब येथील रहिवासी आहे. त्याने याच वर्षी ट्रेनिंग पूर्ण केले आहे.
- या पाकिस्तान रेंजर्सने म्हटले - मी देश सेवेसाठी हजर आहे. कर्तव्य बजावत असताना जर मी शहीद झालो तर तो माझ्यासाठी भाग्याचा क्षण असेल.
- अमरजीतने भारतीय सैनिकासोबत हस्तांदोलन केले तेव्हा दोन्ही बाजूंकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.
- अमरजीत 2009 पासून पाकिस्तान रेंजर्समध्ये आहे.

पाक आर्मीत सहभागी झालेले पहिले शीख आहे हरचरणसिंग
- नानकाना साहिब येथील हरचरणसिंग हे पाक आर्मीत सहभागी झालेले पहिले शीख समाजाचे व्यक्ती होते.
- 2005 मध्ये पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होऊन हरचरणसिंग पाक आर्मीत सहभागी झाले.
- त्याआधी पाक आर्मीत एकही शीख व्यक्ती नव्हती.
- यानंतर 2009 मध्ये ज्ञानचंद पाकिस्तानच्या परराष्ट्र सेवेत सहभागी होणारे पहिले हिंदू होते.
- 2013 मध्ये पाकिस्तान आर्मीतील अशोककुमार या हिंदू सैनिकाला वजीरिस्तान येथे लढताना मृत्यू आला होता.
- पाकिस्तान लष्कराने त्यांना शहीदचा दर्जा देण्यास नकार दिला होता, त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

काय आहे बीटिंग द रिट्रीट
- वाघा बॉर्डरवर 1959 पासून बीटिंग द रिट्रीट सेरेमनीला सुरुवात झाली.
- दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर येण्याचा हा सोहळा पाहाण्यासाठी उभय देशांचे हजारो लोक रोज येथे येतात.
- वाघा बॉर्डरवर रोज सायंकाळी दोन्ही देशांचे झेंडे उतरवले जातात.
- 1965 आणि 1971 मध्ये भारत-पाक युद्धा दरम्यान रिट्रीट होत नव्हते.
- हा सोहळा जवळपास 156 सेकंद चालतो. या दरम्यान दोन्ही देशांचे जवान मार्च करत बॉर्डरपर्यंत येतात.
- पाकिस्तानकडून रेंजर्स आणि भारताचे बीएसएफ जवान यात सहभागी होतात.
- या वेळी दोन्ही देशांचे जवान नाकाला नाक लागेपर्यंत जवळ येतात.
- मार्चमध्ये जवानाचे पाय जेवढे उंच जातात तेवढा त्यांचा मार्च उत्कृष्ट मानला जातो.
- दोन्ही देशांचे जवान जेवढ्या जोरात ओरडतात, तेव्हा प्रेक्षकही त्यांचा उत्साह वाढवतात.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाक आर्मीतील पहिले शीख हरचरणसिंग आणि फोटोज्..