आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेटा, लवकरच परत येईन, तुला खेळणी आणीन, म्हणाला होता जवान; पण तिरंग्यात आला देह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बटाला - रायचक्क गावाचे रहिवासी जवान पलविंदरसिंग गत रात्री श्रीनगरहून 50 किमी दूर खन्नेवालमध्ये जवानांसह गस्तीवर होते. अचानक सीमेजवळ लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी त्यांची चकमक उडाली आणि दहशतवाद्यांशी दोन हात करताना पलविंदरसिंग शहीद झाले. पलविंदर यांच्या मानेत गोळी लागली होती. सध्या ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. आणि मागच्या 17 वर्षांपासून लष्करात सेवा बजावत होते. 

 

पप्पा म्हणाले होते- लवकरच घरी येईल...
- 15 दिवसांपूर्वीच पप्पा ड्यूटीवर गेले होते. तेव्हा म्हणाले होते की, लवकरच परत येईन. तुमच्यासाठी खेळणीही आणणार आणि फिरायलाही घेऊन जाणार.
- 9 वर्षीय मुलगी सिमरनजित कौर आणि 6 वर्षीय मुलगा सहजप्रीत सिंग दोघेही एकच हट्ट करत होते.
- त्या दोघांना पप्पा शहीद झाल्याचे माहिती नव्हते.

 

देशासाठी शहीद झाल्याचा अभिमानच...
- पलविंदर शहीद झाल्याची बातमी धडकताच गावात शोककळा पसरली. कुटुंबीयांना पलविंदरसिंग शहीद झाल्याचे दु:ख आहेच, पण त्यांनी देशासाठी बलिदान केल्याचा गर्वही आहे.
- वीरपत्नी म्हणाल्या, मला त्यांना गमावल्याचे दु:ख जरूर आहे, पण ते देशासाठी शहीद झाल्याचा आयुष्यभर गर्व राहील.

 

देशाच्या सुरक्षेसाठी ओवाळून टाकले प्राण...
- शहीद पलविंदर यांचे सासरे बलदेवसिंग आणि गावकऱ्यांनीही आपल्या गावातील जवान पलविंदरसिंग यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या.
- गावकरी म्हणाले, देशासाठी जिवाची बाजी लावणारा विरळाच. असे शूरवीर आहेत, म्हणून देश टिकून आहे. 
- पलविंदर यांनी कर्तव्य बजावून आदर्श उभा केला आहे, ते सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...