आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Story In Syllabus Who Abolised Child Marriage, Divya Marathi

बालविवाह रद्द करणा-या महिलेची कथा अभ्यासक्रमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - बालविवाह मानण्यास नकार देणा-या राजस्थानातील जोधपूर येथील लक्ष्मी सरगरा या महिलेची कथा आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहे. यूजीसीने देशभरातील विद्यापीठांनाही या महिलेचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. लक्ष्मी ही देशातील पहिली महिला आहे, जिने बालविवाहास केवळ विरोधच केला नाही तर स्वत: सर्व सरकारी प्रक्रिया करून तो रद्द ठरवला आणि लग्नायोग्य वय झाल्यानंतर पुन्हा आपल्या पसंतीनुसार दुसरे लग्न केले. सारथी ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने तिचा पहिला विवाह रद्द करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
११ वीच्या इयत्तेत
सीबीएसईच्या निर्देशानुसार, ११ वी आणि १२ वी इयत्तेला या सत्रापासून ह्यूमन राइट्स अँड जेंडर स्टडीज हा नवा विषय सुरू करण्यात आला आहे. ११ वीच्या पाठ्यपुस्तकात दुस-या धड्यात पान क्रमांक २०७ वर लक्ष्मीची सत्यकथा आहे.